IND vs NZ भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, ‘या’ गोलंदाजाला मिळणार कर्णधारपद

न्यूझीलंडने या दौऱ्यासाठी आधीच एकदिवसीय संघ जाहीर केला असून आता टी-२० संघाचीही घोषणा केली आहे. या मालिकेतही पुन्हा एकदा नवा कर्णधार दिसणार आहे.

IND vs NZ भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, ‘या’ गोलंदाजाला मिळणार कर्णधारपद

टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे, या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडने या दौऱ्यासाठी आधीच एकदिवसीय संघ जाहीर केला असून आता टी-२० संघाचीही घोषणा केली आहे. या मालिकेतही पुन्हा एकदा नवा कर्णधार दिसणार आहे.

न्यूझीलंडने टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंड संघाची कमान केन विल्यमसनच्या हाती राहणार नाही. या मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी मिचेल सँटनरला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. २७ जानेवारीपासून दोन्ही संघांमधील टी-२० मालिका सुरू होणार आहे.

केन विल्यमसनशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीही भारत दौऱ्यावर येणार नाही. या दोन्ही खेळाडूंना वनडे आणि टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. टीम साऊदीला नुकतेच न्यूझीलंड कसोटी संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंवरील वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. टॉम लॅथमला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा: तारीख आणि सामन्याचे ठिकाण
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा टी-२० संघ:

मिशेल सेंटनर (कप्तान), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन, डेन क्लीवर, डेवोन कॉनवे, जैकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, बेन लिस्टर, डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, माइकल रिपन, हेनरी शिपली, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर.

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा वनडे संघ:

टॉम लाथम (कप्तान), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन, डेवोन कॉन्वे, जैकब डफी, लॉकी फर्ग्युसन, डग ब्रेसवेल, एडम मिल्ने, डैरिल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सैंटनर, ईश सोढी, एच शिप्ली.

हे ही वाचा:

धक्कादायक घटना, Hockey World Cup कव्हर करणार कोरियन पत्रकार पडला नाल्यात

Hockey World Cup 2023 आज होणार टीम इंडियाचा पहिला सामना, शाहरुखपासून विराटपर्यंत सर्वांनी दिल्या शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version