spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs NZ : टीम इंडियाच्या विजयाच्या आशांवर पाणी

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाणेफेकीपूर्वीही पावसानं हजेरी लावली. परंतु, सामना वेळेत सुरू झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन वेळा सामना थांबवण्यात आला. परंतु, हॅमिल्टन येथील पावसाचा अंदाज पाहता अखेर सामना रद्द करण्यात आला. पावसामुळं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० नं पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे.

सामना रद्द होण्यापूर्वी भारताने एक विकेट गमावून ८९ धावा केल्या होत्या. शुभमन गिल ४५ धावा करून नाबाद होता, तर सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ३४ धावा करत गिलला साथ दिली. हा सामना रद्द झाल्यानंतर भारताला यापुढे मालिका जिंकता येणार नाही. किवी संघ ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना ३० नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ बदल केले होते. शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहर आणि संजू सॅमसनच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश करण्यात आला होता. शेवटचा सामना ठाकूरला चांगलाच महागात पडला, तर ऑकलंडकडून सॅमसनने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या. हॅमिल्टनमध्ये गिलने २१ चेंडूत १९ धावा केल्या, ज्यात ३ चौकार मारले. तर धवनने ८ चेंडूंचा सामना करत २ धावा केल्या. गेल्या सामन्यात दोघांनी अर्धशतकी खेळी खेळली होती.

भारताचा संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडचा संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोढी.

हे ही वाचा : 

Bhedia Box Office Collection : वरूणच्या चित्रपटाने सलग दुस-या दिवशी पकडला वेग, इतक्या कोटींची कमाई

सुषमा अंधारे भेटणार ‘या’ शिंदे गटाच्या आमदारला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss