spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs PAK: मेलबर्नच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; मेलबर्नमधला काय आहे हवामान अंदाज ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषक २०२२ मधील सर्वात मोठा सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. दोन्ही संघ यंदा तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. या ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यापूर्वी हे दोघे गेल्या महिन्यात आशिया चषकात आमनेसामने आले होते. भारताने गट टप्प्यातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला, तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत सुपर ४ टप्प्यात भारताचा पराभव केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात ़पाऊस पडणार असल्याची जोरदार शक्यता आहे. कारण हा सामना मेलबर्न येथे रविवारी होणार आहे. रविवारी मेलबर्न येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामना नेमका कधी सुरु होणार, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. पण हा सामना आता किती वाजता सुरु होणार आहे, याचे कारण आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी मैदानाची पाहणी ही साधारणपणे दुपारी १२.०० च्या दरम्यान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सामन्याचा टॉस होईल. टॉसचा निकाल लागल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार हे आपलं संघ जाहीर करतील. दोन्ही कर्णधारांनी आपाला संघ जाहीर केल्यावर अर्ध्या तासांचा ब्रेक घेतला जाईल. या ब्रेकनंतर हा सामना दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना दुपारी १.३० ते साधारणपणे ४.३० वाजेपर्यंत पाहायला मिळू शकतो. पण जर पावसाने या सामन्यात घोळ घातला तर मात्र हा सामना कधी सुरु होईल, हे सांगणे सर्वात कठीण असेल. कारण पाऊस थांबल्यावर सामन्याचे पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर मैदान कधी सुकवलं जाईल याची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर मैदान सुकले की नाही याची ते पुन्हा पाहणी करतील आणि त्यानंतर दोन्ही संघांना सामना कधी आणि किती वाजता सुरु होणार, याची कल्पना देतील. त्याचबरोबर हा सामना किती षटकांचा खेळवण्यात येणार आहे, याची माहितीही ते दोन्ही कर्णधारांना देतील. त्यानंतर दोन्ही संघ या माहितीनुसार आपली रणनीती आखतील.

टी२० क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ यांच्यात आतापर्यंत ११ टी-२० सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने ११ पैकी ८ सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला ३ सामने जिंकता आले आहेत.

भारताचा संघ असा असू शकतो रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंच्या आधी कृषी मंत्री पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या भेटीला

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss