spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs PAK T20 : अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर केली बाबर आझमची शिकार

ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात (Melbourne Ground) आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) महामुकाबला रंगत आहे.

ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात (Melbourne Ground) आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) महामुकाबला रंगत आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची चर्चा आहे. अखेर आज तो क्षण जवळ आला आहे. भारताने नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय हा घेतला. आणि पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या खेळाडूला बाद केले.

भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबर आझमला शुन्यावर बाद केले. अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पाठोपाठ आघाडीचा फलंदाज मोहम्मद रिझवानला देखील बाद करत दुसरी मोठी शिकार केली.

 भारताने नाणेफेक जिंकून MCG च्या ग्रीन टॉपवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात फक्त १ धाव दिली. त्यानंतर दुसऱ्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमला शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था १ बाद १ धाव अशी केली.

 भुवनेश्वर कुमारनं मेलबर्नच्या मैदानात पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्यानं वाईडच्या रुपात एकच धाव दिली. पण त्यानंतर आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळत असलेल्या २३ वर्षांच्या अर्शदीप सिंगनं कमाल केली. त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला माघारी धाडलं. अर्शदीपचा टप्पा पडून आत येणारा बॉल बाबरच्या पॅडवर जाऊन धडकला आणि तो जाळ्यात अडकला. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये अर्शदीपनं पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना जगातला नंबर वन T20 बॅट्समन मोहम्मद रिझवानला माघारी धाडलं. त्यामुळे पाकिस्तानी संघाची पहिल्या ४ ओव्हरमध्येच दाणादाण उडाली.

अवघ्या १५ धावात पाकिस्तानने दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर शान मसूद आणि इफ्तिकार अहमदने पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरूवात केली. या दोघांनी ९ व्या षटकात पाकिस्तानचे अर्धशतक धावफलकावर लावले.

हे ही वाचा :

IND vs PAK T20 World Cup: नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

IND vs PAK: मेलबर्नच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; मेलबर्नमधला काय आहे हवामान अंदाज ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss