IND vs PAK T20 World Cup: नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात (Melbourne Ground) आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) महामुकाबला रंगणार आहे.

IND vs PAK T20 World Cup: नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात (Melbourne Ground) आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) महामुकाबला रंगणार आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची चर्चा आहे. अखेर आज तो क्षण जवळ आला आहे. भारताने नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय हा घेतला आहे.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील महामुकाबला रंगत असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला भारतासमोर गोलंदाजी करताना याआधीही अडचणी आल्याने भारताने प्रथम बोलिंगचा निर्णय़ घेऊन पाकिस्तानला कमी धावांत रोखण्याचा निर्धार करत हा निर्णय़ घेतला आहे. तसंच भारत सामन्यात ७ फलंदाज घेऊन उतरत असून चेस करणं शक्य असल्याने हा निर्णय़ घेतला आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान असणाऱ्या ग्रुपमध्ये इतर संघ तितके खास फॉर्ममध्ये नसल्याने आजचाच सामना जिंकणं भारत आणि पाकिस्तान दोघांसाठी महत्त्वाचं असेल,तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताच्या प्लेईंग ११ चा विचार करता सात फलंदाजांसह भारत मैदानात उतरत आहे. विशेष म्हणजे ऋषभ पंतला संघात जागाम मिळाली नसून दिनेश कार्तिक यष्टीरक्षक असणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा महत्त्वाचा फॅक्टर आहे. पहिल्या दोन सराव सांमन्यात सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली आहे.

गोलंदाजी टीम इंडियासाठी थोडा चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार आहे. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्यास टीम इंडियाच्या विजयाची शक्यता जास्त आहे. T20 वर्ल्ड कपआधी आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम्स आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी दोन्ही टीम्सनी प्रत्येकी १-१ सामना जिंकला होता.

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

Exit mobile version