Ind vs Pak Women- पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी केला पराभव

Ind vs Pak Women- पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी केला पराभव

महिला आशिया कपमधील भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे कालच थायलँडलने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यात पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी पराभव करत भारताला मोठा धक्का दिला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संपूर्ण डाव १२४ धावात संपुष्टात आला. पाकिस्तानकडून नाशरा संधूने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर सादिका इक्बाल निदा दार यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. फलंदाजीत निदा दार नाबाद ५६ धावांची खेळी केली. भारताकडून रिचा घोषने सर्वाधिक २६ धावा केल्या.

भारतीय संघ या स्पर्धेत तीन सामने जिंकला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आजचा सामना जरी भारताने गमावला तरी भारत गुणतालिकेत अव्वल आहे. पाकिस्तानने आजचा सामना जिंकून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तसेच ते उपांत्य फेरीत दाखल झाले. पाकिस्तानला मागील सामन्यात थायलंडने पराभूत करत चांगलाच धक्का दिला होता, त्यातून सावरत आणि स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्याच्या हेतूने ते मैदानात उतरणार आहेत.

पाकिस्तानची पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली असताना कर्णधार बिसमाह मारूफ आणि निदा दार यांनी पाकिस्तानचा डाव सारवला. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. चौथ्या विकेटसाठी पाकिस्तानची कर्णधार मारूफ आणि दार यांनी ७६ धावांची दमदार चभागीदारी रचली. मात्र ही भागीदारी रेणुका सिंगने मारूफला ३२ धावांंवर बाद करत फोडली.यानंतर पाकिस्तानच्या बाकीच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. निदा दारने ३७ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी करून पाकिस्तानला २० षटकात ६ बाद १३७ धावांपर्यंत पोहचवले. भारताकडून दिप्ती शर्माने ३, पूजा वस्त्रकारने २ तर रेणुका सिंहने १ विकेट घेतली.

पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या डावातील चौथ्याच षटकात मेघनाच्या रुपात भारताला मोठा धक्का बसला. त्यानंतर सहाव्या षटाकातील दुसऱ्याच चेंडूवर जेमिमाह रॉड्रिग्ज ७ चेंडूत २ धावा करून बाद झाली. स्मृती मानधनाही स्वस्तात माघारी परतली. तिनं १८ चेंडूत १७ धावा केल्या. भारतासाठी रिचा घोषनं सर्वाधिक २६ धावांचं योगदान दिलं. भारतीय संघ १९.४ षटकात १२४ धावांवर ऑलआऊल झाला. पाकिस्तानकडून नसरा संधूनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर,सादीया इक्बाल आणि निदा दार यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, अनवर आणि तुबा हसन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.

हे ही वाचा:

सीटसाठी महिलांनी लोकल ट्रेनलाच बनवला आखाडा; हाणामारीत महिला पोलिस जखमी

धनुष्यबाण निश्चितपणे आम्हालाच मिळेल ; रामदास कदम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version