Saturday, June 29, 2024

Latest Posts

IND vs SA Final : T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारताला दिल्या ऍडव्हान्स शुभेच्छा, बॉलीवूडकडून आला विशेष संदेश

टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे.

T20 World Cup 2024 India vs South Africa Final: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. आजचा हा अंतिम सामना शनिवार, दिनांक २९ जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल. टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आज भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सामना सुरू होईल. आजच्या या सामन्याकडे लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच नजर या लागल्या आहेत. पण, या सामन्याआधीच टीम इंडियाला बॉलीवूडमधून विजयाबद्दल ऍडव्हान्स शुभेच्छा या देण्यात आल्या आहेत. अभिनेता सोनू सूदने टीम इंडियाला आगाऊ शुभेच्छा दिल्या.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना क्रिकेटमध्ये रस आहे. टीम इंडिया जेव्हाही कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना खेळते तेव्हा बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात. जर आपण सोनू सूदबद्दल बोललो तर तो अनेकदा भारतीय क्रिकेट संघाबद्दल काही ना काही बोलतांना दिसतो. तो अनेकदा भारतीय खेळाडूंनाही भेटतो. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचे आगाऊ अभिनंदन करताना त्याने X वर लिहिले, “टीम इंडियाचे आगाऊ अभिनंदन. विश्वचषक आमचा आहे.”

यावेळेस टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत करून T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या दोन आयसीसी स्पर्धांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला खोलवर जखमा केल्या होत्या. याआधी २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडने भारताला उपांत्य फेरीत पराभूत केले होते. मात्र, या विश्वचषकात टीम इंडियाने बदला घेतला आणि उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. याशिवाय २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताचा अंतिम फेरीत पराभव केला होता. २०२४ T20 विश्वचषक स्पर्धेत, भारताने सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर फेकले. तर भारतीय संघाने शेवटचा २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून टीम इंडिया आयसीसी टूर्नामेंटमध्ये अनेकदा ट्रॉफीच्या जवळ आली पण जिंकू शकली नाही.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

हे ही वाचा:

Maharashtra Budget Session 2024: राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प, Nana Patole यांची टीका

Maharashtra Budget Session 2024: आजचे बजेट म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’, Jayant Patil यांची मिश्किल टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss