Sunday, June 30, 2024

Latest Posts

IND VS SA FINAL : अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, रोहित सेना प्रथम करणार फलंदाजी

टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे.

T20 World Cup 2024 India vs South Africa Final : टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. आजचा हा अंतिम सामना शनिवार, दिनांक २९ जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल. टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आज भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला. आतापर्यंत वर्ल्डकपच्या मागच्या पर्वांचा विचार केला तर नाणेफेक जिंकलेला संघ जेतेपद जिंकला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन भक्कम संघामध्ये फायनल होत आहे, असे नाणेफेकीवेळी रोहित शर्माने सांगितले. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम सांगितलं की, “प्रथम फलंदाजीही केली असती. विकेट कोरडी दिसतंयच. पण आम्हाला गोलंदाजी करताना पहिल्यांदा क्रॅक मिळेल त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकतो. काही वेळा आम्ही आमच्या सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही पण तरीही आम्ही जिंकण्यात यशस्वी झालो आहोत आणि त्यातून आम्ही आत्मविश्वास बाळगतो.


दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

Latest Posts

Don't Miss