IND VS SA: आज रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी20

IND VS SA: आज रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी20

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ट्वेंटी -२० मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. हा दुसरा सामना आज २ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील एकहाती विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच बळावला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. पहिला सामना भारताने ८ विकेट्सच्या फरकाने जिंकत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेऊ शकेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ आपलं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. त्यांनी सामना जिंकल्यास मालिकेत दोघेही १-१ अशी बरोबरी घेतील.

‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात, दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप

रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसऱ्या टी-२० च्या आधी आकाशात आच्छादलेल्या ढगांमुळे आयोजक आणि चाहते चिंतेत पडले आहेत, कारण पावसामुळे या स्टेडियममधील मागील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना रद्द करण्यात आले होते. करोना महामारीनंतर गुवाहाटीमधला हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे, ज्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

गुवाहाटीत तसे फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत नाही, त्यामुळे तेथील क्रिकेटप्रेमींसाठी उद्याचा सामना पर्वणीच घेऊन आला आहे. सर्व तिकिटे संपलेली आहेत. दुर्गा पूजेचा उत्सव, त्यात क्रिकेटचा सामना; यामुळे गुवाहाटीमधील वातावरण बदलले असून सर्वत्र वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय खेळाडूंच्या बसलाही या कोंडीचा फटका बसला.विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी बुमराला केंद्रस्थानी ठेवून भारतीय संघ व्यवस्थापनाने तयारी सुरू केली होती, परंतु आता डावपेच बदलावे लागणार आहेत, पण त्यासाठी दोनच सामने शिल्लक आहेत. दक्षिण आाफ्रिकेविरुद्धच्या उरलेल्या दोन सामन्यांसाठी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. शमी कोरोनातून मुक्त झाला असला, तरी त्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजचा सामन्यात हर्षल पटेलला विश्रांती देऊन सिराजला खेळवले जाण्याची शक्यता अधिक आहे.

 भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह (दुखातग्रस्त), शाहबाज अहमद.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळ उडवून टाकण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हाताच्या कंकणाला आरसा कशाला?, शेलारांचे शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर

Follow Us

 

Exit mobile version