spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs SA: रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

टी २० वर्ल्डकप २०२२ मधील ३० व्या सामन्यात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका भिडणार आहेत. सुपर १२ फेरीतील ग्रुप २ मधील हे दोन तगडे एकमेकांविरूद्ध दंड थोपटणार असले तरी या सामन्याकडे ग्रुप २ मधील इतर संघाचे देखील लक्ष असणार आहे. कारण आजच्या सामन्यावर पाकिस्तानचा आशा निराशेचा खेळ रंगणार आहे.

भारतीय संघाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा १०४ धावांनी पराभव केला. तर दुसरा झिम्बाब्वेविरूद्धचा सामना वॉश आऊट झाल्याने त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. सध्या गुणतालिकेत भारत ४ गुण घेत अव्वल तर बांगलादेश ४ गुण घेत धावगतीच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ३ गुणांसह तिसऱ्या स्थाावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका सध्या दोघेही कमाल फॉर्मात असल्याने आज दोघांना विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या विजयामुळे ग्रुप २ गुणतालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातीस एकजण आणखी मजबूत आघाडी घेऊ शकतो. तसंच सेमीफायनलमध्येही पोहोचण्यासाठी दोघांना आजचा विजय अत्यंत फायदेशीर असेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्य कुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – कंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टियन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, अँनरिक नोरखिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

हे ही वाचा :

मंत्री संदिपान भुमरेंनी केली घोषणा; पैठणमध्ये वारकऱ्यांसाठी पहिली स्वतंत्र बँक होणार सुरु

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिले अभिनेता विजय वर्माला निमंत्रण ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss