IND vs SA : श्रेयस अय्यने अर्धशतक ठोकून एक विशेष कामगिरी केली, अशी कामगिरी करणारा जगातील तिसरा खेळाडू

IND vs SA : श्रेयस अय्यने अर्धशतक ठोकून एक विशेष कामगिरी केली, अशी कामगिरी करणारा जगातील तिसरा खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २५० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ २४० धावाच करू शकला. टीम इंडियासाठी श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामुळे त्याने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली. २०२२ मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत अय्यर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेही वाचा : 

Thackeray vs Shinde : धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात ठाकरे – शिंदेंचा सामना

२०२२ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. त्याने १७ अर्धशतके केली आहेत. या बाबतीत बांगलादेशचा लिटन दास दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १३ अर्धशतके झळकावली आहेत. यानंतर मोहम्मद रिझवान तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १० अर्धशतके केली आहेत. अय्यर यांचाही या यादीत समावेश झाला आहे. तो रिझवानसोबत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत १०-१० अर्धशतके केली आहेत.

Arun Bali Death : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

सामना भारतानं ९ धावांनी गमावली

सामन्यात भारतीय संघानं दमदार झुंज दिली, पण अखेर ९ धावा कमी पडल्याने भारताने सामना गमावला. यावेळी नाबाद ८६ धावांची खेळी करत संजूनं एकहाती झुंज दिली, पण अखेर त्याची झुंज व्यर्थ ठरली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी संघासाठी ४० षटकांचा केला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २४९ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी २५० धावा करायच्या होत्या. पण भारत ४० षटकांत२४० धावाच करु शकला आणि भारताने सामना ९ धावांनी गमावला.

राज्यात २५ लाख हेक्टर जमीन… : देवेंद्र फडणवीस

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version