IND VS SA: नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा निर्णय

IND VS SA: नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा निर्णय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना आज रांची येथे खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने ९ धावांनी जिंकून मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना हा भारतासाठी करो या मरो असा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे. वेगळं कारण सहसा नाणेफेक जिंकणारे संघ आधी गोलंदाजी करुन नंतर निर्धारीत लक्ष्य चेस करण्यापासून प्रतिस्पर्धी संघाला रोखत असतात. दुसऱ्या इनिंगमध्ये दव ही पडल्याचं दिसून येत असतं. असं असतानाही दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार टेम्बा आज संघात नसून केशव महाराज कर्णधार आहे. त्याने आजची विकेट फलंदाजीसाठी चांगली दिसत असल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

रांचीमध्ये रविवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्याचा टॉस जेव्हा होईल तेव्हा पावसाचे सावट नसेल. पण दुपारी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यावेळी सामन्याचा टॉस जरी वेळेत होणार असला तरी सामना उशिरा सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सामना सुरु असताना पावसाचा काही वेळा व्यत्यय होऊ शकतो. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते. त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द होणार नाही पण सामन्यात व्यत्यय नक्की येऊ शकतो. त्यामुळे या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार हे नक्की असल्यामुळे जो संघ टॉस जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्राधान्य देईल. कारण प्रथम फलंदाजी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही.

दोन्ही संघानी आज संघात प्रत्येकी दोन बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा संघात नसून केशव महाराज कर्णधार आहे. दरम्यान टेम्बा बावुमा आणि तबरेज शम्सी या दोघांना ठिक वाटत नसल्याने आज ते सामन्यात नसून रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे दीपक चाहर दुखापतीमुळे दौऱ्याबाहेर गेल्यानंतर भारतीय संघात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला टीम इंडियात जागा मिळाली असून शाहबाज अहमदही संघात आहे. रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड यांना विश्रांती दिली गेली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र, ‘या’ चिन्हाची आणि नावाचं मागणी

चिन्ह असो अथवा नसो निवडणुकीला सोमोरे जायची तयारी ठेवली पाहिजे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version