IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, सामन्यात पावसाची शक्यता

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, सामन्यात पावसाची शक्यता

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी २० सामना गुवाहाटी येथे होत आहे. कोरोना काळापासून गुवाहाटीत कोणाताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झालेला नाही. त्यामुळे आजच्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याची चांगली क्रेज गुवाहाटी येथे निर्माण झाली आहे. ३९ हजार प्रेक्षक क्षमता असलेले बरसपारा स्टेडियम फुल पॅक असणार आहे.

तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतीलस पहिला सामना भारताने ८ विकेट्सच्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेऊ शकेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ आपलं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. त्यांनी सामना जिंकल्यास मालिकेत दोघेही १-१ अशी बरोबरी घेतील. मात्र प्रेक्षकांच्या या सर्व उत्साहावर पावसाचे पाणी फिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने सामन्यादरम्यान दोनवेळा वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून रविवारी गुवाहाटीचे वातावरण ढगाळ आहे.

भारतच संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवीचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर.

हे ही वाचा:

केवळ ५०० रुपये भरून तुम्ही जाऊ शकता तुरुंगात, सरकारच्या अजब योजनेमुळे लोक झाले थक्क

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले श्री सप्तश्रृंगी मातेचे दर्शन

Follow Us

Exit mobile version