spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs SL, Asia Cup 2023, रोहित शर्मानं झेलबाद केल्यावर विराट कोहलीनं मारली घट्ट मिठी, व्हिडीओ वायरल…

स्टार भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची गणना जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते.

स्टार भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची गणना जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. भारतासह जगभरात विराट आणि रोहितचे चाहते आहेत. दोघांच्यही नावावर अनेक विक्रम (records) आहेत. विक्रम रचण्यामध्ये या दोघांची जुगलबंदी चालू असते. यामुळे दोघंही कायम चर्चेत असतात. अनेक वेळा या दोघांमधील वाद झाल्याच्या चर्चा समोर येतात. इतकंच नाही तर, या दोन्ही खेळाडूंचे चाहतेही सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवण्यासाठी मागे-पुढे पाहत नाहीत. आता मात्र, या दोघांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

आशिया कपमधील (Asia Cup 2023) श्रीलंकेविरुद्धच्या (Sri lanka) सामन्यातील विराट आणि रोहित यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमधील ब्रोमान्स (Bromance) दिसून येत आहे. आशिया कप २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं झेल घेत श्रीलंकेचा शेवटचा गडी बाद केला. यामुळे भारताने सुपर-४ मधील सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. रोहित शर्माने श्रीलंकेच्या खेळाडूचा कॅच घेताच विराट कोहलीनं धावत जाऊन त्याला कडकडून मिठी मारली. हा क्षण कॅमेऱ्यात चित्रित झाला. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्रीलंकेच्या डावातील २६ षटक सुरु होतं. टीम इंडियाकडून जडेजा (Jadeja) गोलंदाजी करत होता. यावेळी श्रीलंकेचा दसून शनाका (Dasun Shanaka) स्टाईकवर होता. जड्डूने चेंडू फेकताच शनाकाने बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. जडेजाने फेकलेला चेंडू न समजल्याने बॉल शेवटचा बॅटला लागला आणि स्लीपमध्ये गेला. यावेळी रोहित शर्मा याने संधी साधत हा झेल पकडच शनाकाला झेलबाद केलं. अशा प्रकारे श्रीलंकेचा शेवटचा दहावा गडी बाद झाला. श्रीलंकेचा शेवटचा गडी बाद केल्यामुळे भारताने विजय मिळवला. या आनंद साजरा करण्यासाठी विराट कोहली याने रोहितला ‘जादू की झप्पी’ दिली.

आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला २१४ धावांचं लक्ष दिलं होतं. या धावसंसख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १७२ धावांवर आटोपला. टीम इंडियाच्या फलंदाजीमुळे श्रीलंकेची आघाडीची फलंदाजी फेल ठरली. ७३ धावांवर श्रीलंकेचा अर्धा संघ बाद झाला होता.

हे ही वाचा: 

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी यांनी दिली एक मोठी अपडेट…

डोंबिवली लोकलमधील महिला डब्यात एका वेळेस दोन ते तीन पुरूष फेरीवाल्यांची घुसखोरी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss