IND Vs WI: पहिल्या ODI मॅचमध्ये टीम इंडियाचा विडिंजवर विजय.

पहिल्या एकदिवसीय (First ODI) सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिजचा (West Indies) पाच विकेटने पराभव केला. बारबाडोसच्या (Barbados) मैदानावर वेस्ट इंडिजने दिलेल्या अवघ्या ११५ धावांच्या आव्हानाचा (Target) पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक उडाली होती.

IND Vs WI: पहिल्या ODI मॅचमध्ये टीम इंडियाचा विडिंजवर विजय.

पहिल्या एकदिवसीय (First ODI) सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिजचा (West Indies) पाच विकेटने पराभव केला. बारबाडोसच्या (Barbados) मैदानावर वेस्ट इंडिजने दिलेल्या अवघ्या ११५ धावांच्या आव्हानाचा (Target) पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक उडाली होती. भारतीय संघाने २३ षटकात (over) ५ विकेटच्या मोबदल्यात ११८ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ईशान किशन (Ishan Kishan) याने अर्धशतकी (Half century) खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत १-० च्या फरकाने विजय मिळवला.

केवळ ११५ आव्हानाचा पाठलाग करतानाही भारतीय संघाची दमछाक उडाली होती. ११५ धावांसाठी भारतीय संघाला २३ षटके आणि ५ विकेट गमवाव्या लागल्या. ११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) अवघ्या सात धावा काढून बाद झाला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यालाही मोठी खेळी करता आली नाही, सूर्यकुमार यादव २५ चेंडूत १९ धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने ३ चौकार आणि एक षटकार लगावला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पाच धावांवर धावबाद (run out) झाला. शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) याला फक्त एक धाव काढता आली. धावसंख्या कमी असल्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी इतरांना फलंदाजीसाठी प्रमोट (Promote) केले, पण या खेळाडूंना संधीचे सोनं करता आले नाही. रोहित शर्माने नाबाद १२ धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) १६ धावांवर नाबाद राहिला. ईशान किशन याने दमदार अर्धशतक झळकावले. ईशान किशन याने ४६ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. वेस्ट इंडिजकडून मोटी (Motie) याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान विडिंज संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघाला ५० षटकेही फलंदाजी करता आली नाही. विडिंजने २३ षटकात ११४ धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून शाय होप (Shay Hope) याने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या ओलांडता आली नाही. वेस्ट इंडिजचे सात फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करु शकले नाहीत. शाय होप ४३, काइल मायर्स २, ब्रँडन किंग १७, एलिक एथनाज २२, शिमरोन हेटमायर ११, रोवमन पॉवेल ४, रोमारियो शेफर्ड ०, यानिक कारिया ३, डोमिनिक ड्रेक्स ३, जेडन सील्स ० आणि गुडाकेश मोटी ० धावा करु शकले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. शाय होप आणि हेटमायर (Hetmire) यांनी संयमी सुरुवात करत विडिंजची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागिदारी केली. ब्रँडन किंग (Brandon King) आणि एलिक एथनाज (Elic Ethanaz) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावा जोडल्या. या दोन भागिदारी वगळता विडिंजकडून एकही भागिदारी दुहेरी धावसंख्या पार करु शकली नाही.

भारतीय गोलंदाजांनी (bowlers) सुरुवातीपासूनच भेदक मारा केली. अनुभवी गोलंदाज नसतानाही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. नवख्या भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा संघ ढेपाळला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने सर्वाधिक विकेट घेतल्या. कुलदीप यादव याने ३ षटकात ४ विकेट घेतल्या.. यामध्ये दोन षटके निर्धाव फेकली. रविंद्र जाडेजा याने ६ षठकात ३७ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. त्याशिवाय हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. उमरान मलिक (Umran Malik) याला विकेट घेण्यात अपयश आले.

हे ही वाचा:

पावसाचा कहर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भात यलो अलर्ट

G-२० बैठकीत नेमके काय झाले बोलणे ?

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीची ठरली तारीख

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version