Independence Day 2024 Narendra Modi : ‘आम्ही भारतात होणाऱ्या २०३६ ऑलिम्पिकची तयारी करत आहोत’, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

आज संपूर्ण देशात ७८ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Independence Day 2024 Narendra Modi : ‘आम्ही भारतात होणाऱ्या २०३६ ऑलिम्पिकची तयारी करत आहोत’, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Independence Day 2024 Narendra Modi : आज संपूर्ण देशात ७८ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. यावेळी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींनी २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांविषयीही भाष्य केले. ते म्हणाले की, भारताचा दर्जा जागतिक दर्जाचा व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही डिझाईन इन इंडिया, डिझाइन फॉर वर्ल्ड या दिशेने काम करत आहोत.

ते म्हणाले की जी-20 देश जे करू शकत नाही ते भारतातील जनतेने केले आहे. पॅरिसमध्ये निर्धारित केलेले अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट वेळेपूर्वी गाठू शकणारा कोणताही देश असेल तर तो फक्त आपला भारत आहे. २०३६ च्या ऑलिम्पिक खेळांबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, G-20 च्या बैठका देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये झाल्या. यावरून हे सिद्ध होते की भारतामध्ये आणखी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची क्षमता आहे. २०३६ मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांसाठी आम्ही तयारी करत आहोत. पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि पॅरिसला पॅरालिम्पिकसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या खेळाडूंनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

तर दुसरीकडे आज या खास प्रसंगी पंतप्रधान मोदी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या ११७ खेळाडूंच्या भारतीय तुकडीची भेट घेणार आहेत. पदक विजेत्या खेळाडूंसह सर्व खेळाडूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण भारतीय संघाला पंतप्रधान निवासस्थानी भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरून भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या निवासस्थानी सर्व ऑलिम्पिक खेळाडूंना भेटणार आहेत. २०२० टोकियो ऑलिम्पिक खेळ २०२१ मध्ये कोविड महामारीमुळे आयोजित करण्यात आले होते, जिथे भारतीय संघाने एकूण ७ पदके जिंकली होती. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण ऑलिम्पिक तुकडीसोबत खास बैठक घेतली आणि खेळाडूंसोबत डिनरही केले.

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या दिवसांची सुट्टी आता होणार आनंददायी; Central Railway चालवणार १८ विशेष रेल्वे गाड्या!

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version