भारताला विजयासाठी २८० धावांची गरज, भारताचा संघ १२१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार?

सध्या जगभरामध्ये चर्चा सुरु आहे ती फक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्याची. आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा शेवटचा दिवस आहे आणि आज भारतासमोर २८० धावांचे लक्ष्य आहे.

भारताला विजयासाठी २८० धावांची गरज, भारताचा संघ १२१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार?

सध्या जगभरामध्ये चर्चा सुरु आहे ती फक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्याची. आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा शेवटचा दिवस आहे आणि आज भारतासमोर २८० धावांचे लक्ष्य आहे. कांगारूने दुसऱ्या इंनिंगमध्ये ४४४ धावांचे लक्ष्य टीम इंडियासमोर उभे केले आहे. आजचा दिवस हा भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. भारताच्या संघाने चौथ्या दिवसाच्या अखेरीस ३ विकेट गमावून १६४ धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये उतरणार आहे.

भारतीय वेळेनुसार आजचा सामना हा दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. आजचा हा दिवस दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता घोषित होणार आहे. कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या टॉप-७ लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्यांमध्ये टीम इंडियाचं नाव दोनदा सामील झाले आहे. पहिल्या वेळी भारताचा संघ ४०६ धावांचा पाठलाग करत होता. परंतु त्यावेळी भारताच्या संघाला ६ विकेट्सनी पराभवाचा सामान करावा लागला होता. ७ एप्रिल १९७६ रोजी भारताच्या संघाने हा पराक्रम केला होता. भारतीय क्रिकेट संघाचे कसोटीतील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं लक्ष्य आहे. त्यांनतर भारताच्या संघाने ११ डिसेंबर २००८ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम केला होता. भारतीय संघानं इंग्लंडला हरवलं होतं. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं ६ विकेट्सनी विजय मिळवला होता.

या संघानी केलाय सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग?

Exit mobile version