spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कोणाला मिळाली संधी

आशिया कप संपल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते २०२२ च्या विश्वचषकावर . ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रोलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) भारताची घोषणा केली आहे. आता या टीमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात असणार आहे. विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्या पार्श्वभूमीवर बी.सी.सी आय. ने विश्वचषकासाठी नवीन खेळाडूंची यादी जाहीर करण्यात केली आहे.

हे खेळाडू खेळणार विश्वचषकामध्ये –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Vivo Y22 भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर आणि किंमत

स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

आशिया कपमध्ये भारतीय प्रेक्षकांना भारतीय संघाकडून कडून चांगली अपेक्षा होती. पण काही गोष्टींमुळे भारताला आशिया कपमध्ये पराज्याला सामोरे जावे लागले. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने भरपूर प्रयोग केले होते. हे प्रयोग करण्यामागे खेळाडूंची विश्वचषकासाठी चाचपणी घेणे, हे एकमेव ध्येय होते. भारतीय संघाचे कर्णधार पद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे. विश्वचषकासाठी अष्टपैलू खेळाडूंवर भारतीय निवड समितीने जास्त भर देण्याचे ठरवले आहे. कारण अष्टपैलू खेळाडू हे संघासाठी बाराव्या खेळाडूचे काम करत असतात. आशिया चषकातील गोलंदाजांमध्ये मोठी उणीव जाणून आली, ही उणीव भरण्यासाठी बी.सी.सी.आय काम करत आहे.

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे आशिया चषकांमध्ये त्याला आराम देण्यात आला होता पण विश्वचषकामध्ये पुन्हा एकदा त्याचे आगमन झाले आहे. टी २० विश्वचषक २२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना मेलबर्न येथे होणार आहे.

हे ही वाचा:

सर्वांच्या लाडक्या भाईजानवर गँगस्टरचा निशाण

पळवापळवीचे अनोखे रूप, मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच काही सेकंदातच १०० किलो पेढे, लाडू गायब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss