spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आशिया चषक स्पर्धेत अटीतटीच्या लढाईत आता, भारत विरुद्ध हाँगकाँग

आशिया चषक स्पर्धेत अटीतटीच्या लढती होत आहेत. अव्वल चार संघांत प्रवेश करण्यासाठी सर्वच संघ प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान पाकिस्तानविरोधातील विजयानंतर आज भारताची हाँगकाँगविरोधात लढत होणार आहे. भारत संघ हाँगकाँग संघाच्या तुलनेत सरस असून आजच्या सामन्यात भारताचा विजय निश्चित आहे, सध्या तरी असे म्हटले जात आहे. मात्र ह्या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. याच कारणामुळे भारत आपली विजयी वाटचाल कायम राखणार का? हे आता पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा पोलिसांच्या अटकेत, घरगुती नोकराचा छळ केल्याचा आरोप

कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघात काही बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या सामन्यात रोहित शर्मा एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार की ऋषभ पंतला संधी देऊन आपली बॅटिंग डेप्थ अजून वाढवणार हे पहावे लागले. आजचा सामना देखील दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरच रंगणार आहे.

हेही वाचा : 

नोकियाचा नवा अविष्कार : ५,००० पेक्षा कमी किंमतीचा आणि 4G मोबाईल भारतात लॉन्च

पाकिस्तानविरोधातील सामन्यात शून्यावर बाद झालेल्या केएल राहुलला वगळून ऋषभ पंतला संधी दिली जाते का हे पाहावे लागेल. तसेच भारताकडे दीपक हुडा हादेखील धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यालादेखील संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. मागील सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहल खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर आर. आश्विन या अष्टपैलुला रोहित संधी देऊ शकतो.

Latest Posts

Don't Miss