spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India vs Australia : भारताचा मुख्य गोलंदाज करणार का पुनरागमन ?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज दुसरा T20 सामना पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला २०९ धावांचं लक्ष्य देऊनही पराभव पत्करावा लागल्यामुळे आज भारतीय संघात बदल होण्याची दाट शक्यता आहे.

India vs Australia Probable 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज दुसरा T20 सामना पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला २०९ धावांचं लक्ष्य देऊनही पराभव पत्करावा लागल्यामुळे आज भारतीय संघात बदल होण्याची दाट शक्यता आहे. आजच्या सामन्यात भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघात पुनरागमन करणार आहे, तो उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी संघात येईल.

मंगळवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारताची रात्र निराशाजनक होती. पहिल्या सामन्यात भारताला २०९ धावांचं लक्ष्य देऊनही पराभव पत्करावा लागला. कारण ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स आणि चार चेंडू राखून मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला. शुक्रवारी नागपुरात खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या T20 मध्ये, टीम इंडिया आपली गोलंदाजी, विशेषत: वेगवान आक्रमण मजबूत करण्याचा प्रयत्न करेल, कारण पहिल्या टी20 सामन्यात मैदानात उतरलेल्या उमेश यादवने तब्बल ४३ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला. यावेळी त्याने दोन षटकात २७ रन दिले. त्याने स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल असे महत्त्वाचे विकेट्स घेतले खरे पण त्याने बऱ्याच धावा देखील दिल्या. दुसरीकडे हर्षल पटेलने ४ ओव्हरमध्ये ४९ तर भुवनेश्वर कुमारने ४ ओव्हरमध्ये ५२ रन दिले. अशामध्ये भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज बुमराहची कमतरता सर्वांनाच जाणवली. ज्यामुळे दुसऱ्या T20 मध्ये बुमराह नक्कीच संघात येऊ शकतो. चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती., जो या सामन्यात पुनरागमन करणार होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना सायंकाळी होणार असून याच दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचा हा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा क्षेत्र छत्तीसगडवर केंद्रीत आहे. २३ सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेशावर केंद्रित राहील. मात्र त्याचा जोर कमी झालेला असेल असे अंदाज हवामान विभागाचे नागपूर येथील प्रादेशिक केंद्राचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केले आहे.

कशी असू शकते अंतिम टीम ?

संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ – आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.

हे ही वाचा:

Big Boss Marathi 4 : “चटर पटर चटर पटर… “, बिग बॉस मराठीच्या सीझन ४ चं टायटल साँग रिलीज

Nagpur News : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी नागपूर पोलीस आयुक्तांच्या सूचना, प्रेक्षकांनी कारचा प्रवास टाळावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss