Friday, June 28, 2024

Latest Posts

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

आम्ही जास्त घाबरलो नाही आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचं ठरलं आहे.

भारताने सेमी फायनल मध्ये इंग्लंडचा पराभव करत सलग सातव्यांदा विजय मिळवला आहे. टीम इंडिया (Team India) ने इंग्लंडला पराभूत करत T-20 वर्ल्ड कप सेमी फायनल (Semi Final) च्या पराभवाचा एका अर्थी बदलाच घेतला आहे. टीम इंडियाने 172 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 16.4 ओव्हरमध्ये 103 धावांवर आऊट केलं. टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध फायनलमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी लढणार आहे. कॅप्टन रोहित शर्माला टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांची गेल्या 11 वर्षांची आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा संपवण्यासाठी सध्या सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. भारताने 23 जून 2013 रोजी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून टीम इंडियाला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे आता कॅप्टन रोहितला इंग्लंडला पराभूत केल्यानंतर या संबंधित प्रश्न विचारण्यात आले. यानंतर रोहित शर्माने दिलेल्या उत्तराने सर्वांचेच मन जिंकले आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

आम्ही जास्त घाबरलो नाही आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचं ठरलं आहे. चांगलं क्रिकेट खेळायचं आणि अंतिम फेरीमध्ये तसंच करायचं आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू एवढेच मी सांगेन. टीम चांगल्या स्थितीत आहे. सर्वजण चांगले खेळत आहेत. फायनलमध्ये आणखी एक चांगला शो सादर करण्याची मला आशा असल्याची प्रतिक्रिया रोहित शर्माने सामन्यानंतर दिली.

कोण आहेत  टीम इंडियाचे खेळाडू?

टीम इंडियाच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्षदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू असणार आहेत.

इंग्लडच्या टीममध्ये कोणते खेळाडू?

इंग्लंडच्या टीममध्ये जोस बटलर, फिलिप्स फिलिप सॉल्ट, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रिस्ट टोपले हे खेळाडू समाविष्ट असणार आहेत.

हे ही वाचा:

“सरकारला लाज कशी वाटत नाही?” राज्याच्या दरडोई उत्पन्नावरून Jitendra Awhad यांचा Maharashtra Government ला सवाल

तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, Nana Patole यांची Maharashtra Government कडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss