भारत विरुद्ध पाकिस्तानचा पुन्हा सामना रंगणार

आशिया कपमध्ये(asia cup) टीम भारत (team india) अतिशय फॉर्मात आहे. भारताने आशिया कपमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला(pakistan) ५ विकेटनी मात दिली तर दुसऱ्या सामन्यात हाँग काँग (Hong Kong)च्या संघाला ४० धावांनी हरवले.

भारत विरुद्ध पाकिस्तानचा पुन्हा सामना रंगणार

आशिया कपमध्ये(asia cup) टीम भारत (team india) अतिशय फॉर्मात आहे. भारताने आशिया कपमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला(pakistan) ५ विकेटनी मात दिली तर दुसऱ्या सामन्यात हाँग काँग (Hong Kong)च्या संघाला ४० धावांनी हरवले. या सामन्यानंर भारताने सुपर ४साठी क्वालिफाय केले आहे. आशिया कपमध्ये भारत रविवार ४ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगू शकतो. भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानचा संघ आज हाँगकाँगविरुद्ध सामना खेळणार आहे. जर पाकिस्तानी संघाने हा सामना जिंकला तर ग्रुप एकमधून ते क्वालिफाय करतील. अशातच ४ सप्टेंबरला चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक महामुकाबला पाहायला मिळू शकतो.

आशिया चषक स्पर्धेत सलग भारताने पाकिस्तानचा चौथ्यांदा पराभव केला. यापूर्वी २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्स पराभव केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने आठ घडी राखून दुसऱ्या सामन्यात नऊ विकेट्स घेत पाकिस्तानचा पराभव केला होता. आशिया कपमध्ये भारतीय संघाचे पारडे नेहमीच पाकिस्तानपेक्षा वरचढ राहिले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये १५ सामने रंगले यात भारतानने ९ सामने जिंकलेत तर पाकिस्तानने ५. तर भारताने सर्वाधिक ७ वेळा आशिया कप जिंकला आहे.

आशिया कपचे सविस्तर वेळापत्रक

२७ ऑगस्ट शनिवार श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान

२८ ऑगस्ट रविवार भारत विरुद्ध पाकिस्तान

३० ऑगस्ट मंगळवार बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

३१ ऑगस्ट बुधवार भारत विरूद्ध क्वालिफायर

१ सप्टेंबर गुरूवार श्रीलंका विरूद्ध बांगलादेश

२ सप्टेंबर शुक्रवार पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर

३ सप्टेंबर शनिवार बी १ विरूद्ध बी २ सुपर ४

४ सप्टेंबर रविवार ए १ विरूद्ध ए २ सुपर ४

६ सप्टेंबर मंगळवार ए १ विरूद्ध बी १ सुपर ४

७ सप्टेंबर बुधवार ए २ विरूद्ध बी २ सुपर ४

८ सप्टेंबर गुरूवार ए १ विरूद्ध बी २ सुपर ४

९ सप्टेंबर शुक्रवार बी १ विरूद्ध ए २ सुपर

११ सप्टेंबर रविवार फायनल सामना

 

हे ही वाचा :

ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा एक नवा धक्का!

आज नासाकडून होणार नवीन चंद्रयान लाँच

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version