spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याला सुरुवात, नाणेफेक जिंकत श्रीलंकेने घेतला गोलंदाजीचा निर्णय

श्रीलंकेचा संघाने २०१६ मध्ये भारतीय भूमीवर शेवटचा विजय मिळवला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ५८ मीटरची बाऊंड्री रेषा खूपच लहान असल्याने गोलंदाजांची दमछाक होत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याला आज मुंबईत सुरुवात झाली. हार्दिक पांड्या पहिल्यांदाच घरच्या मैदानावर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम धावा जमा होण्यासाठी अनुकूल मानले जाते. मात्र, हवामानाची स्थिती बदलत असल्याने निर्णय विरोधी संघाच्या बाजूनेही जाण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेच्या संघाने भारतीय भूमीवर आतापर्यंत १३ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ११ सामने जिंकले असून श्रीलंकेच्या संघाने २ सामने जिंकले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या मागील ५ टी-२० सामन्यांमध्ये समोरच्या संघाचा पराभव झाला आहे. श्रीलंकेचा संघाने २०१६ मध्ये भारतीय भूमीवर शेवटचा विजय मिळवला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ५८ मीटरची बाऊंड्री रेषा खूपच लहान असल्याने गोलंदाजांची दमछाक होत आहे.

सुमन गिल आणि शिवम मावी आज भारतीय संघात टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला वगळण्यात आले असून दीपक हुडाला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हवामानाच्या बदलाची आशंका असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे शनाका यांनी नमूद केले. यानंतर हार्दिक पांड्याने सांगितले की, मी प्रथम फलंदाजी केली आहे. मी हा निर्णय घेणार होतो कारण मालिकेत दोन्हीकडे आव्हाने असलीच पाहिजेत. अर्दीप सिंग दुखापतीमुळे बाहेर आहे, असे त्याने सांगितले.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशान चहल. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.

हे ही वाचा:

‘माझा श्वास थांबला होता’, पहिल्यांदाच टीम इंडियात सामील झाल्यानंतर हा युवा वेगवान गोलंदाज झाला भावूक

टीम इंडियासाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी… जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss