झिम्बाब्वेच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

झिम्बाब्वेच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

भारतीय क्रिकेट संघाच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेचा ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. तिसऱ्या सामन्याचा आणि संपूर्ण मालिकेचा सलामीवीर शुभमन गिल हा हेरो ठरला आहे. शुभमन गिलने मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या आंतरराष्ट्रीय शतकाचे खातेही उघडले. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने शुभमन गिलचे कौतुक केलं. शुभमन गिलच्या १३० धावांच्या बळावर भारताने ५० षटकांत ८ बाद २८९ धावा केल्या. शुभमन गिलने अतिशय संयम दाखवला आणि त्याने आपला डाव मोठ्या गतीने उभारला.

टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

शुभमन गिलच्या खेळीमुळेच भारताने बोर्डवर सन्माननीय धावसंख्या जमा केली. या खेळीदरम्यान शुभमन गिलने १५ चौकार आणि एक षटकार लगावला. भारतासाठी इशान किशनने ५० धावा केल्या आणि भारताकडून दुसरा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज ठरलाकेएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक चहर अंतिम सामन्यात परतला, तर आवेश खानचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला. मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा यांनी या जोडीचा वाटा उचलला.

या संघाच्या विजयानंतर सगळ्या खेळाडूंनी आंदन साजरा केला. त्यांनी डान्स करताना एक व्हिडीओपण शेअर केला आहे. यात शिखर धवनने कॅप्शनमध्ये म्हटले, ” आम्ही अशा प्रकारे विजय साजरा करतो. हॅशटॅग काला चष्मा.’ आणि काला चष्मा या हिंदी गाण्यावर त्यांना डान्स केला आहे. झिम्बाब्वेला या मालिकेत हरवल्यानंतर टीम इंडियाने ड्रेसिंग रूममध्ये जोरदार जल्लोष केला. त्यांचा आनंद साजरा करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

उत्तरेकडचं राजकारण महारष्ट्रात सुरु झालंय, परिस्तिथी गंभीर आहे, सभेत राज ठाकरेंचे सूचक व्यक्तव

Exit mobile version