spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतचा बांगलादेश विरोधात ५ धावांनी विजय

भारताने बांगलादेश विरोधात ५ धावांनी विजय झाला आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामना कमालीचा रोमहर्षक झाला. दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ, मग पावसाचा व्यत्यय, ओव्हर्ससह टार्गेटमध्ये बदल झाल्यानंतर अखेर भारतानं ५ धावांनी सामना जिंकला आहे. त्यामुळे अगदी रोलरकोस्टर राईडप्रमाणे झालेला सामना अखेर भारताच्या बाजूने झुकला.

पावसामुळे अतिरंजक झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५ धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे तिकिट फिक्स केले. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशसमोर १६ षटकात विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र बांगलादेशला १६ षटकात १४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पांड्याने २ तर अर्शदीप सिंगने २ विकेट घेतल्या. भारताने ठेवलेल्या १८५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर लिटन दासने भारताच्या गोलंदाजींच्या चिंधड्या उडवून देत संघाला ७ षटकात ६६ धावांपर्यंत पोहचवले. यात लिटन दासच्या एकट्याचे नाबाद ५९ धावांचे योगदान आहे. दुसरा सलामीवीर नजिमुल हुसैन शांतोने १६ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या आहेत. दरम्यान, सात षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना थांबला. पावसाने उसंत घेतल्यामुळे सामना भारतीय वेळेनुसार ४.५० मिनिटांनी सामना पुन्हा सुरू झाला. बांगलादेशला डीएलएस नियमानुसार आता ६ षटकात १५१ धावांच नवं टार्गेट मिळालं. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी बांगलादेश ७ षटकात बिनबाद ६६ धावांवर होता. म्हणजे बांगलादेशला आता ५४ चेंडूत ८५ धावा कराव्या लागणार होत्या.

बांगलादेशविरूद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक ही भारताची मोठमोठी नावं आपल्या लैकिकास साजेसा खेळ करू शकली नाही. अखेर भारताची रन मशिन पुन्हा एकदा भारतासाठी उभी राहिली. विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी करत भारताला 184 धावांपर्यंत पोहचवले. सलामीवीर केएल राहुलने देखील यंदाच्या टी २० वर्ल्डकपमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. तसेच सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने देखील १६ चेंडूत ३० धावांची आक्रमक खेळी केली. अश्विनने ६ चेंडूत १३ धावा करून शेवटच्या षटकात मोठा हातभार लावला. मात्र या चौघांव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून हसन महमूदने दमदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.

हे ही वाचा :

प्रियांका चोप्रा तिच्या हेअरकेअर ब्रँडचा प्रचार करण्यासाठी मुंबईत

शाहरुख खान : पाच वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खानचे आगमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss