spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय बॉक्सर नीतू घंघासने मंगोलियाच्या खेळाडूला पराभव करून गोल्ड पदकावर नाव कोरले

भारतामधील आघाडीची बॉक्सर नीतू घंघास (Neetu Ghanghas) हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप (Women's World Boxing Championship) स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे.

भारतामधील आघाडीची बॉक्सर नीतू घंघास (Neetu Ghanghas) हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप (Women’s World Boxing Championship) स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. ४८ किलो वजनी गटामध्ये नीतू घंघास हिने मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंग (Lutsekhar Altengseng) हिचा पराभव करून सुवर्ण पदकावर (gold medal) नाव कोरले आहे. बॉक्सर नीतू घंघास हिने लुटसेखर अलतेंगसेंग हिचा ५-० ने पराभव केला आहे. याआधी २५ मार्च रोजी नीतू घंघास हिने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. दिल्ली येथे सुरु झालेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेमध्ये भारताला आणखी तीन महिला बॉक्सरकडून सुवर्णपदाची अपेक्षा आहे. यामध्ये स्विटी बूरा (Sweetie Boora) , निखत जरीन (Nikhat Zareen) आणि लवलीना बोरहेगन (Lovelina Borhagen) या बॉक्सरचा समावेश आहे. नीतू घंघास हिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्यांनतर भारतीय चाहत्यांच्या नजरा स्वीटी बूरा हिच्या सामन्याकडे आहे. स्वीटी बूरा वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिपच्या फायनलमध्ये पोहचली आहे. ८१ किलो वजनी गटामध्ये तिचा आज सामना होणार आहे. स्वीटी बुराकडून चाहत्यांना आणखी एका पदाची अपेक्षा आहे. त्यांनतर रविवारी निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन यांच्या सामान्याकडेही चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. या दोघींकडूनही भारतीयांना सुवर्णपदाची आपेक्षा आहे.

वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन या दोघीनी सुद्धा फायनलमध्ये धडक मारली आहे. २६ मार्च रोजी या दोघी मैदानामध्ये उतरणार आहेत. भारतीयांना या दोघींकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत भारतामधील चार महिला बॉक्सरने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये नीतू घंगास हिने सुवर्ण पदक मिळवले आहे. तर आज रात्री स्वीटी बुराचा सामना आहे तर २६ मार्च रविवारी निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन रिंगमध्ये उतरणार आहेत. या तिन्ही सामन्याकडे भारतीय क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन अजित पवार सरकारवर संतापले

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss