भारत क्रिकेट संघाला धक्का, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी ‘या’ खेळाडूला गंभीर दुखापत

भारत क्रिकेट संघाला धक्का, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी ‘या’ खेळाडूला गंभीर दुखापत

भारतीय खेळाडू नवदीप सैनी दुखापतीमुळे भारत अ संघाबाहेर आहे. तो न्यूझीलंड अ विरुद्धच्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेत खेळणार होता. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नवदीपला दुखापत झाली. तो उत्तर विभाग संघाचा भाग आहे. नवदीपच्या जागी ऋषी धवनचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने ट्विटद्वारे सैनीच्या दुखापतीची माहिती दिली. बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले की, “नवदीप सैनी उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. ते सध्याच्या स्पर्धेतून तसेच भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडले आहेत. निवड समितीने नवदीपऐवजी ऋषी धवनचा संघात समावेश केला आहे.

हेही वाचा : 

आता भाजपला चित्ता सरकार म्हणायचं का?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

विशेष म्हणजे नवदीप सैनी हा उत्तम गोलंदाज आहे. त्याने टीम इंडियासाठी दोन कसोटी, ८ एकदिवसीय आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान नवदीपने वनडेमध्ये ६, कसोटीत ४ आणि टी-२० फॉरमॅटमध्ये १३ विकेट घेतल्या. इंडियन प्रीमियर लीगमध्येही तो ३० सामने खेळला आहे. दुलीप ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.

भारत अ संघ: पृथ्वी शॉ, अभिमन्यू इसवरन, रुतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (क), केएस भरत (विकेटकीपर), कुलदीप यादव, शबाज अहमद, राहुल चहर, टिळक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, ऋषी धवन, राज अंगद बावा.

Chandigarh University Case : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित MMS लीक, पोलिसांची चौकशी सुरु

Exit mobile version