spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर अडकणार विवाह बंधनात

Shardul Thakur Wedding: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा (Team India) आणखी एक क्रिकेटपटू विवाहबंधनात अडकणार आहे. एकीकडे सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना शार्दूल ठाकूरही (Shardul Thakur) लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचा साखरपुडा मुंबई येथे पार पडला होता. शार्दूल गर्लफ्रेंड मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहे.

मितालीने सांगितले की, आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणाऱ्या शार्दुलचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि तो २४ फेब्रुवारीपर्यंत क्रिकेट खेळणार आहे. यानंतर २५ फेब्रुवारीपासून उत्सव सुरू होईल. शार्दुल २५ फेब्रुवारीपासून लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात २००-२५० पाहुणे उपस्थित राहणार आहेत. शार्दुल टीम इंडियाच्या शेड्यूलमुळे व्यस्त असल्याने लग्नाची सर्व तयारी मी करत आहे. पुढे बोलताना मितालीने सांगितले की, लग्नाचे मुख्य कार्यक्रम कर्जतमध्ये (Karjat) होणार आहेत. याआधी आम्ही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं होतं पण लॉजिस्टिक आणि खूप लोकांमुळे सगळ्या व्यवस्थेत खूप अडचणी आल्या असत्या. या कारणामुळे आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शार्दुलची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे. तर पालघरचा असणारा शार्दूल आधी आयपीएलमधून सर्वांसमोर आला होता. सुरुवातीला काही संघातून खेळण्यानंतर धोनीच्या कॅप्टन्सीखाली चेन्नई सुपरकिंगमध्ये शार्दूलचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर तिथेही त्याने आपली खास जागा बनवली. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत मिळून ठोकलेलं एक अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं. त्यामुळेच भारत मालिकाही जिंकला होता.

हे ही वाचा : 

कर्नाटकात गोंधळ निर्माण करणारं अँटी – हलाल बिल नक्की आहे तरी काय?

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलीस उपाशी

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss