spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय गर्भवती महिलेने पटकावले पदक

Olympiad 2022 : ऑलिम्पियाड 2022 बुद्धिबळ (Chess Olympiad) स्पर्धेत भारताच्या महिलांनी कांस्य पदक मिळवले आहे. दरम्यान यावेळी संघातील खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली (Harika Dronavali) ही देखील होती. नऊ महिन्यांची गर्भवली असताना हरिकाने संघासाठी खेळत भारताला पदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटाने कांस्य पदकाला गवसणी घातली. हरिका ही 9 महिन्याची गर्भवती असतानाही तिने अशा स्थितीतही खेळत एक धाडसी वृत्तीचे उदाहरण समोर ठेवलं आहे.

हरिकाने विजयानंतर आपली प्रतिक्रिया दिली, “मी वयाच्या 13 व्या वर्षी भारतीय महिला बुद्धिबळ संघात पदार्पण केले त्यानंतर मी आतापर्यंत खेळत आहे. 18 वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत 9 ऑलिम्पियाड खेळल्यानंतर भारतीय महिला संघासाठी (Indian Women’s Chess Federation) पदक घेण्यासाठी पोडियमवर येणं माझं स्वप्न होते. जे शेवटी यावेळी पूर्ण झाले आहे. त्यात मी 9 महिन्यांची गर्भवती असताना हे स्वप्न साकार झाल्याने हे अधिक भावनिक आहे. जेव्हा मी भारतात ऑलिम्पियाड आयोजित केल्याबद्दल ऐकले आणि तेव्हा माझ्या डॉक्टरांशी खेळण्याबाबत सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी तू योग्य काळजी घेऊन तणाव न घेता खेळू शकतेस तर खेळ. त्यामुळे संपूर्ण वेळ हा सराव आणि सामन्यात गेल्याने कोणतीच पार्टी, बेबी शॉवर तसंच सेलिब्रेशन करचा आलं नाही. पण मी ठरवले की पदक (Medal जिंकल्यावरच मी सेलिब्रेशन करेल आणि अखेर मी हे करुन दाखवलं. भारतीय महिला बुद्धिबळ संघासाठी पहिले ऑलिम्पियाड पदक जिंकून दिले आहे.” असे हरिकाने म्हटले आहे.

हेही वाचा : 

बहुचर्चित ‘दगडी चाळ २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Latest Posts

Don't Miss