Thursday, July 4, 2024

Latest Posts

T20 WORLD CUP : Team Indian चे ४ जुलै २०२४ चे वेळापत्रक असणार ‘असे’ ; जाणूयात सविस्तर

टीम इंडियानं २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी २०वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या टीमची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी ही भारतीय टीमची मुंबईत विजयी मिरवणूक निघणार आहे.

टी २० विश्वचषक २०२४ चा शेवटचा सामना हा २९ जून २०२४ रोजी उत्तम पद्धतीने रंगला. या सामन्यात गेल्या काही दिवसांपासून भारत विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण सर्वानीच पहिला. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरले आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली (Virat Kohali), वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. तब्बल १७ वर्षांनी हे टी-२० विश्वचषक २०२४ भारताने पटकावले आहे.

टीम इंडियानं २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी २०वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या टीमची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी ही भारतीय टीमची मुंबईत विजयी मिरवणूक निघणार आहे. गुरुवारी संध्याकाळी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान ही मिरवणूक निघणार आहे. त्याच सोबत एकंदरीत ४ जुलै २०२४ रोजी कशाप्रकारे त्यांचे स्वागत होणार या संदर्भाचे एक वेळापत्रक जाहीर झाले आहेत. 

४ जुलै २०२४ वेळापत्रक नेमके कसे असणार ?

  • सकाळी ६.०० वाजता भारतीय संघ दिल्ली येथील एअरपोर्टवर उतरणार 
  • सकाळी ६.४५ ला ITC मौर्या हॉटेलमध्ये त्यांचे आगमन होईल.
  • सकाळी ९.०० वाजता  ITC मौर्या हॉटेलमधून पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे त्यांचे पाचारण करण्यात येईल.
  • सकाळी १०.०० ते १२.०० पर्यंत पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
  • नंतर दुपारी १२.०० च्या सुमारास पुन्हा  ITC मौर्या हॉटेलकडे त्यांचे प्रस्थान केले जाईल. 
  • दुपारी १२.३० वाजता मौर्या हॉटेलकडून तें इंडिया विमानतळाकडे प्रस्थान करणार आहे. 
  • १.०० वाजता मुंबई साठी ते प्रस्थान करतील.
  • ४.०० वाजता मुंबई विमानतळावर पोचतील. 
  • सायंकाळी ५.०० ला वानखेडे स्टेडियम कडे त्यांचे प्रस्थान होईल. 
  • त्यांनतर सायंकाळी ५.०० ते ७.०० च्या सुमारास एक बस परेड होईल. 
  • सायंकाळी ७.०० ते ७.३० या कालावधीत वानखेडे स्टेडियमकडे एक छोटासा कार्यक्रम ख्खास भारतीय संघाच्या विजयोत्सवासाठी घेण्यात येणार आहे. 
  • त्यांनतर ७.३० ला तिकडून निघून ताज हॉटेलसाठी त्यांचे पाचारण करण्यात येईल. 

एकंदरीत अशा प्रकारे दिनांक ४ जुलैचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकर तसेच क्रिकेट प्रेमी हे फार उत्साही असणार आहेत. त्यामुळे हा कर्यक्रम पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. 

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss