भारतीय महिला संघाने इंग्लंडचा उडवला धुवा

भारतीय महिला संघाने इंग्लंडचा उडवला धुवा

काल झालेल्या भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) सामन्यात भारतचा विजय झाला आहे. पहिल्या सामन्यात हरल्या नंतर महिला भारत संघाने इंग्लंडचा चांगलाच धुवा उडवला होता. भारतीय संघ आता १-१ च्या बरोबरी वर आहे. भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडने सहा गडी गमावून १४२ धावा केल्या. तर भारतीय संघाने दोन गडी गमावून १४६ धावा करून सामना जिंकला. या सामन्यात स्मृती मंधानाची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. तिच्या खेळीच्या जोरावर भारताने आठ गडी राखत विजय मिळवला.

बालचोर असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण

भारताला पहिला सामना हरल्यामुळे हा सामना जिंकून आपलं अस्थित्व सामन्या मध्ये कायम ठेवले आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित २० षटकात सहा गडी गमावून १४२ धावा केल्या. इंग्लंडच्या फ्रेया केम्पने ५१ धावा केल्या, तर मायिया बाउचियरने ३४ धावा केल्या. या दोघींशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. भारताकडून स्नेह राणाने तीन, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक बळी घेतला. १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, शेफाली वर्मा २० धावा करून बाद झाली, तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या ५५ धावा झाल्या होत्या. भारताची दुसरी विकेट ७७ धावांवर पडली, जेव्हा दयालन हेमलता ९ धावांवर बाद झाली. यानंतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात भागीदारी होत संघाने १६.४ षटकांत लक्ष्य गाठले.

स्मृती मंधानाची जबरदस्त फलंदाजी

सलामीवीर स्मृती मंधानाच्या ७९ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नाबाद २९ धावांच्या जोरावर भारताने बुधवारी काउंटी क्रिकेट ग्राउंड, डर्बी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला.

ऍमेझॉन प्राइमचा पहिला भारतीय सिनेमा प्रदर्शित होणार, धकधक गर्ल मुख्य भूमिकेत दिसणार

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सामान झाल्या नंतर म्हणाली, आम्हला हा सामना झिंकन आवश्यकतेचं होतं. खराब फटका खेळून कुठल्याही प्रकारचा दबाव संघावर येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. एक सलामीवीर म्हणून बाहेर जाता आणि तुमच्या संघाला चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. यात मला योगदान देता आले याबद्दल आनंद आहे.”

हे ही वाचा:

National Cinema Day: राष्ट्रीय सिनेमा दिवस ढकलला पुढे , ७५ रुपयांना मिळणार नाहीत तिकिटे, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Happy Birthday Suryakumar Yadav : जाणून घेऊया, टीम इंडियाच्या हुकुमी एक्काबद्दल

Follow Us

Exit mobile version