spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs NED: भारताचा नेदरलँड विरोधात दणदणीत विजय;५६ धावांनी मिळवला मोठा विजय

टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताने सुपर १२ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव करत सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर ग्रुप २ मध्ये ४ गुणांसह अव्वल स्थान देखील पटकावले. भारताकडून विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी (६२) खेळी केली. तर सूर्यकुमार यादव (५१) आणि रोहित शर्माने देखील (५३) धावांचे योगदान दिले. भारताने २० षटकात २ बाद १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडने २० षटकात ९ बाद १२३ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल, अश्विन, भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

भारताने पहिला विजय जो साकारला होता तो अखेरच्या चेंडूवर मिळवला होता. त्यामुळे त्यांची त्यावेळी ही संधी हुकली होती. पण भारताने यावेळी दणदणीत विजय साकारला. त्यामुळे या विजयानंतर भारताने विश्वचषकाच्या गुणतालिकेत आता अव्वल स्थान पटकावले आहे. आजचा सामना जिंकल्यावर दक्षिण आफ्रिकेने भारताच्या गटातील अव्वल स्थानावर आपली दावेदारी सिद्ध केली होती. पण त्यांच्या खात्यामध्ये तीन गुण होते, भारताचे या विजयासह चार गुण झाले आहेत. त्यामुळे भारताने या विजयासह गुणतालिकेत आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता भारतीय संघ अव्वल स्थानावर किती काळ कायम राहतो, हे सर्वात महत्वाचे असेल. कारण या प्रत्येक गटातील फक्त दोन संघच उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. त्यामुळे भारताला या अव्वल स्थानावर राहणे महत्वाचे असेल.

भारताने आजच्या सामन्यात दुसरा विजय साकारला. भारताने यावेळी नेदरलँड्सपुढे १८० धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. हे आव्हान पाहूनच त्यांचे अवसान गळून पडले होते. पण दुसरीकडे भारताच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच भारताला यावेळी दणदणीत विजय साकारता आला. भारताचा हा विश्वचषकातील दुसरा विजय ठरला. यापूर्वी भारताने पहिला विजय पाकिस्तानच्या सामन्यात मिळवला होता. आता भारताचा तिसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय घडलं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

हे ही वाचा :

Chinmay Mandlekar : ‘द कश्मीर फाईल्स’ नंतर चिन्मय मांडलेकर ‘सनी’ चित्रपटात दिसणार अत्यंत वेगळ्या भूमिकेत

हे असंवेदनशील सरकार आहे;सरकारने थोडासा वेळ… – सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss