ICC T20, महिला विश्वचषकामध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये संपला प्रवास

ICC T20 महिला विश्वचषक २०२३ मधील भारताच्या महिला संघाचा प्रवास अखेर संपला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.

ICC T20, महिला विश्वचषकामध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये संपला प्रवास

ICC T20 महिला विश्वचषक २०२३ मधील भारताच्या महिला संघाचा प्रवास अखेर संपला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. ऑट्रेलीयाच्या संघाने ५ धावांनी पराभव करून भारताच्या महिला संघाचा प्रवास या ICC T-२० संपवला आहे. पहिला सेमी फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. २६ फेब्रुवारी रोजी जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी जो संघ दुसरी सेमी फायनल सामन्यामध्ये विजेता ठरेल त्या संघासोबत जेतेपदासाठी सामना खेळवला जाणार आहे.

भारताच्या संघाने पहिले तीन विकेट ३.४ ओव्हर्स मध्येच गमावले होते आणि फक्त २८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ने ३४ चेंडूत ५२ धावा केल्या आणि जेमिमाह रॉड्रिग्जने २४ चेंडूत ४३ धावा करत खेळ सांभाळला होता. परंतु त्यांच्या खेळीचा भारतीय संघाला फारसा फायदा झाला नाही. शेवटच्या ५ ओव्हर मध्ये भारतीय संघाने सामना गमावला. भारताच्या संघाने १४.३ ओव्हरमध्ये ४ गडी गमावून १३३ धावा केल्या होत्या.

त्यानंतर हरमन आणि रीचा घोष या दोघी फलंदाजी करत होत्या त्यामुळे भारताचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते परंतु पुढच्या ५ ओवर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचे ४ गडी बाद केले आणि ठेवूनच सामना फिरला. भारताचा निम्मा संघ १३३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. हरमन ५२ धावांवर रनआउट झाली. यानंतर लगेच रिचा घोष हीचा विकेट ऑस्ट्रेलिया संघाला मिळाला. रिचा घोष हिने फक्त १४ धावा केल्या होत्या. स्नेह राणा १५८ धावांवर माघार घेतली आणि राधा यादव १६२ धावांवर बाद होणारी आठवी खेळाडू होती एकापाठोपाठ एक विकेट गेले आणि शेवटच्या शतकामध्ये कांगरूनी सामना त्यांच्या बाजूने फिरवला.

हे ही वाचा :

शिंदे-फडणवीस सरकारने MPSC विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये !, अतुल लोंढे

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde , अनिल देसाईंनी केला मोठा गौप्यस्फोट, सत्तासंघर्षावरील निकाल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version