Sunday, June 30, 2024

Latest Posts

T-20 World Cup मध्ये भारताची बाजी, ठरले ‘इतक्या’ रकमेचे मानकरी

भारताने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत चांगलीच कामगिरी दाखवली. टीम इंडियाने विजेतेपद पटकावला. त्यांनी या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारतीय संघ विजयी झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ग्रुप स्टेज आणि सुपर एट मध्ये प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला. फायनल च्या मोठ्या सामना दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून 17 वर्षानंतर भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकली आणि त्यासोबतच त्यांनी भरपूर कमाई सुद्धा केली. आयसीसी ने 11.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 93.80 कोटी रुपये बक्षीस रक्कम म्हणून ठेवली होती.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप (T-20 World Cup) ची ट्रॉफी जिंकली. या यशासाठी भारतीय संघाला आयसीसी (ICC) कडून 2. 45 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच वीस पूर्णांक 42 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या तसेच या स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 1. 28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 10. 67 कोटी रुपये मिळाले. आयसीसी (ICC) ने सेमी फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघासाठी 7 लाख 87 हजार 500 डॉलर्स म्हणजेच 6.56 कोटी इतकी बक्षिसाची रक्कम ठेवली होती. अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पराभूत झाले होते त्यामुळे त्यांना 6.56 कोटी व्यतिरिक्त प्रत्येक विजयासाठी वेगळे 26 लाख रुपये देण्यात आले आहेत.

जे संघ या स्पर्धेतून बाहेर पडले ज्यांच्या पदरी निराशा आली त्यांना सुद्धा आयसीसी (ICC) कडून रक्कम देण्यात आली आहे. आयसीसी ने नवव्या ते बाराव्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येक विजयासाठी 2.06 कोटी रुपये तसेच 26 लाख रुपये दिले तर तेराव्या ते बाराव्या क्रमांकावर असलेल्या संघांना 1.87 कोटी रुपये आणि 26 लाख रुपये दिले आहेत.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss