IND vs ZIM : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

IND vs ZIM : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

टी-20 विश्वचषकाचा ४२ वा सामना भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात मेलबर्नमध्ये खेळल्या जाणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर-१२ फेरीतील हा शेवटचा सामना आहे. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचे ४ सामन्यांत ६ गुण आहेत.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारत बऱ्याच फलंदाजांसह मैदानात उतरत असल्याने एक मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. विशेष म्हणजे भारतानं आपला स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) संघात घेतलं आहे. भारतीय संघ गुणतालिकेतील कमाल कामगिरीमुळे आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला असला तरी पाकिस्तानकडे ६ गुण आहेत, पण भारताने आज झिम्बाब्वेला मात दिल्यास भारत ८ गुणांसह सर्वाधिक गुणांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल. त्यामुळे सर्वाधिक गुणांनी सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला झिम्बाब्वेला मात देणं गरजेचं आहे. भारतीय संघाच्या अंतिम ११ चा विचार करता केवळ एक बदल करण्यात आला आहे. यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत संघात आला आहे. रोहितने या बदला बद्दल बोलताना पंतने या स्पर्धे एकही सामना खेळलेला नाही, सराव सामनाही नाही. त्यामुळे त्याला संधी देत असल्याचं म्हटलं आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम ११ कशी आहे पाहूया.

भारत संघामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह असतील.

हे ही वाचा :

Andheri East Bypoll Result 2022 : ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर ठाकरे गटाचीच सत्ता

Alia Bhatt Baby Girl : मुलगी झाली हो! आलियानं दिली गोड बातमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version