spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IPL 2023 DC Vs GT, आज येणार दिल्ली आणि गुजरात आमने सामने, पांड्या विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

आयपीएल २०२३ चा आज सातवा सामना (4 एप्रिल) होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे.

Delhi Capitals vs Gujarat Titans : आयपीएल २०२३ चा आज सातवा सामना (4 एप्रिल) होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा संघ या सामन्यात पलटवार करण्याच्या इच्छेवर असेल. त्याचवेळी, सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर ५ गडी राखून विजय नोंदवणाऱ्या हार्दिक पांड्याच्या संघाला आपली विजयी मोहीम सुरू ठेवायची आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच आयपीएलचा सामना दिल्लीत होणार आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाचा आयपीएलमध्ये फार जुना इतिहास नाही. इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने दार ठोठावले होते. पहिल्याच वर्षी इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावण्यात या संघाला यश आले होते. आयपीएलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गुजरातसमोर दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नाही. आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला आहे. आयपीएल २०२२ मध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 गुजरात टायटन्सचा संघ गतविजेता आहे. ३१ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३ च्या सलामीच्या सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या संघाने १७१ धावा करून हा सामना गमावला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल आणि राशिद खान यांनी अप्रतिम कामगिरी केली. जिथे शुभमनने फलंदाजीत अर्धशतक झळकावले, तर रशीद खानने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर गुजरात टायटन्सचा उत्साह वाढला आहे. अशा स्थितीत दिल्ली संघाला सावध राहावे लागणार आहे. कारण गुजरातविरुद्ध दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नाही.

GT Playing XI : गुजरात संभाव्य प्लेइंग 11

शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ

DC Playing XI : दिल्ली संभाव्य प्लेइंग 11

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ललित यादव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

तसेच तुम्ही सर्व आयपीएल २०२३ (IPL 2023) सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता आणि Jio Cinema ॲप आणि वेबसाइटवर स्ट्रीमिंग पाहू शकता. मोबाइल युजर्स Jio सिनेमा वेबसाइटवर सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss