IPL Auction 2023 चक्क अनुभवी अजिंक्य रहाणेची स्वस्तात अटोपली बोली

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६ व्या हंगामासाठी लिलाव सुरु झाला असून अगदी नवनवीन निकाल लागताना दिसत आहेत. आयपीएल २०२३ साठी कोची येथे खेळाडूंचा लिलाव सुरू आहे.

IPL Auction 2023 चक्क अनुभवी अजिंक्य रहाणेची स्वस्तात अटोपली बोली

IPL Mini Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६ व्या हंगामासाठी लिलाव सुरु झाला असून अगदी नवनवीन निकाल लागताना दिसत आहेत. आयपीएल २०२३ साठी कोची येथे खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, या लिलावात टीम इंडियाचा एक क्रिकेटर आयपीएल करिअर संपण्यापासून थोडक्यात वाचला आहे. या क्रिकेटरची फार स्वस्तात डील झाली. हा लिलाव सुरू होण्यापूर्वी, या खेळाडूचे आयपीएल करिअर संपेल आणि त्याला कोणताही संघ किंमतही देणार नाही, असे मानले जात होते, परंतु तसे काहीही झाले नाही. एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या अनुभवी अजिंक्य रहाणेला केवळ ५० लाखांना चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे.

IPL Auction 2023 ला सुरवात, ‘या ‘ खेळांडूवर सुरु आहे कोट्यावधी रुपयांची बोली, जाणून घ्या अपडेट एका क्लिकवर…

इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुकला (Harru Brook) तब्बल १३.२५ कोटींना सनरायझर्स हैदराबादने (SRH) विकत घेतलं आहे. तर एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या अनुभवी अजिंक्य रहाणेला केवळ ५० लाखांना चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे. याशिवाय पंजाब किंग्सचा माजी कर्णधार मयांक अगरवाल याला देखील सनरायझर्स हैदराबादने ८.२५ कोटींना विकत घेतलं आहे. तर केन विल्यमसन २ कोटींच्या बेस प्राईसमध्ये गुजरात टायटन्सकडे गेला आहे.

आता अजिंक्य रहाणेला हा क्रिकेटर आयपीएल २०२३ च्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल. मधल्या फळीतील फलंदाज असलेला अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियापासून दूर आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२३ च्या सीझनसाठी ५० लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले आहे. आता तो महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल २०२३ मध्ये खेळताना दिसेल. अजिंक्य रहाणेला IPL २०२२ सिझनसाठी कोलकाता नाइट राइडर्ससंघाने १ कोटी रुपयांत विकत घेतले होते. मात्र, आयपीएल २०२२ च्या ७ सामन्यांत त्याला केवळ १३३ धावाच करता आल्या होत्या. आयपीएल २०२२ मध्ये खराब प्रदर्शन केल्याने यावर्षी कोलकाता नाईट राइडर्सने त्याला रिलीज केले होते. आता आयपीएल २०२३ सीझनच्या लिलावात रहाणेला चेन्नई सुपर किंग्सने ५० लाखात विकत घेत घेऊन त्याचे संपनारे आयपीएल करीअर वाचवले आहे.

या लिलावात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला पंजाब किंग्जने तब्बल १८.५० कोटी रुपयांना सामील करून घेतले आहे. करनला दुखापतीमुळे लीगच्या मागील हंगामाला मुकावे लागले होते, मात्र या मोसमात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. करनला विकत घेण्यासाठी त्याच्या दोन जुन्या संघ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये चांगलीच लढत रंगली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासह करन हा या लीगमध्ये सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडूही ठरला आहे.

याआधी आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chri Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्सने त्याला २०२१ मध्ये १६.२५ कोटींना खरेदी केले होते. पण यंदा त्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. सॅमसह ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन ग्रीन आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्सनेही मॉरिसला मागे टाकलं आहे. ग्रीनला १७.५० कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन स्टोक्सला १६.२५ कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे.

हे ही वाचा:

IPL 2023 च्या मिनी लिलावासाठी सर्व सज्ज.. BCCI ने स्टार हॉटेलमध्ये केले दोन मजले बुक

IPL 2023 Mini Auction मध्ये दिसणार सनरायझर्स हैदराबादचा लक्ष्यवेधी चेहरा, जाणून घ्या नक्की कोण आहे हा चेहरा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version