IPL Auction 2024, शार्दुल ठाकूर खेळणार चेन्नई सुपर किंग्जकडून…

धोनीच्या चेन्नई संघाने आज अष्टपैलू खेळाडूंची खरेदी केली. चेन्नईने मुंबईच्या शार्दूल ठाकूर आणि न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याला आपल्या ताफ्यात घेतले.

IPL Auction 2024, शार्दुल ठाकूर खेळणार चेन्नई सुपर किंग्जकडून…

IPL Auction 2024 Live : धोनीच्या चेन्नई संघाने आज अष्टपैलू खेळाडूंची खरेदी केली. चेन्नईने मुंबईच्या शार्दूल ठाकूर आणि न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याला आपल्या ताफ्यात घेतले. आता शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आयपीएल २०२४ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळणार आहे.

आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल ठाकूरला ४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शार्दुल ठाकूरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूसाठी बोली लावली. पण चेन्नई सुपर किंग्जने त्याला ४ कोटी रुपये खर्चून करारबद्ध केले. याआधीही शार्दुल ठाकूर चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. त्याचवेळी शार्दुल ठाकूर पिवळ्या जर्सीत दिसणार आहे.

शार्दुल ठाकूर प्रथमच आयपीएल २०१४ च्या मोसमात खेळला होता. या हंगामात शार्दुल ठाकूर पंजाब किंग्जचा भाग होता. यानंतर शार्दुल ठाकूर रायझिंग पुणे सुपरजायंट्स (Rising Pune Supergiant), चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळला. आयपीएल २०२२ च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने शार्दुल ठाकूरला १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. शार्दूल केकेआरकडून २०२२ आणि २०२३ असे २ वर्ष खेळला. शार्दुलने २०२३ मध्ये ११ सामन्यात १ अर्धशतक, ४ सिक्स आणि १३ चौकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या. शार्दुलने या दरम्यान ६८ धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच ७ विकेट्सही घेतल्या.

शार्दूल ठाकूर याने ८६ आयपीएल सामन्यात आतापर्यंत प्रतिनिधित्व केलेय. यामधील ३४ डावात तो फलंदाजीला आलाय. त्यामध्ये त्याने २८६ धावा केल्या आहेत. १४० च्या स्ट्राईक रेटने त्याने गोलंदाजांची पिटाई केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या ६८ इतकी आहे. त्याने आतापर्यंत १२ षटकार आणि २५ चौकार ठोकले आहेत. तळाला फटकेबाजी करण्यात शार्दूल पटाईत आहे. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर याने आतापर्यंत ८९ विकेट घेतल्या आहेत. ४ विकेट एकवेळा घेण्याचा पराक्रम त्याने केलाय.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version