IPL2023, आज IPL २०२३ मध्ये डबल धमाका, धुव्वाधार संडे

आयपीएलमध्ये आज डबल धमाका होणार आहे, एकीकडे कोहली आणि रोहित यांच्यामध्ये चुरशीची लढत आणि दुसरीकडे हैदराबाद विरुद्ध राजस्थान हा सामना रंगणार आहे. पाहिला सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे.

IPL2023, आज IPL २०२३ मध्ये डबल धमाका, धुव्वाधार संडे

आयपीएलमध्ये आज डबल धमाका होणार आहे, एकीकडे कोहली आणि रोहित यांच्यामध्ये चुरशीची लढत आणि दुसरीकडे हैदराबाद विरुद्ध राजस्थान हा सामना रंगणार आहे. पाहिला सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघांमध्ये आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील आज चौथा सामना हैदराबाद आणि राजस्थान या दोन संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा पहिला सामना आज २ एप्रिल रोजी ३.३० वाजता रंगणार आहे. हा सामना हैदराबादमधील जीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. हैदराबादचा मूळ कर्णधार एडन मार्करम हैदराबादच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारवर असणार आहे त्याचप्रमाणे राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करणार आहे.

हैदराबादची संभाव्य प्लेईंग ११ काय असणार?
मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, ग्लेन फिलिप्स, वासिगंटन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), उमरान मलिक, अकील हुसेन, आदिल रशीद.

राजस्थानची संभाव्य प्लेईंग ११ काय असणार?
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.

आयपीएल २०२३ मध्ये पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये होणार आहे. रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये सामना असल्यामुळे कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजचा सामना हा रोमांचक ठरणार आहे आणि या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. RCB आणि MI यांच्यातील सामना बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे.

बंगळुरूची संभाव्य प्लेईंग ११ काय असणार?
डू प्लेसिस (कर्णधार), फिन ऍलन, विराट कोहली, महिपाल लोमरोर, माइक ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, करण शर्मा, रीस टोपली, मोहम्मद सिराज.

मुंबईची संभाव्य प्लेईंग ११ काय असणार?
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अर्शद खान, जेसन बेहनडॉर्फ.

हे ही वाचा : 

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

प्रेमाच्या ‘सरी’ची ‘संमोहिनी’, रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

IPL 2023 : आज रंगणार दोन सामने! ‘हे’ संघ येणार आमने-सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version