जर्मनीचा दारुण पराभव करत जपानने दिला धक्का; २-१ ने जपानचा मोठा विजय

जर्मनीचा दारुण पराभव करत जपानने दिला धक्का; २-१ ने जपानचा मोठा विजय

फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) मंगळवारनंचर आजही एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. फीफा रँकिंगमध्ये ११ व्या स्थानी असणाऱ्या जर्मनीला २४ व्या स्थानावरील जपान संघाने २-१ ने मात दिली आहे. विशेष म्हणजे ७४ मिनिटांपर्यंत जर्मनीचा संघ १-० ने आघाडीवर होता पण ७५ आणि लगेचच ८३ व्या मिनिटाला जपानने गोल करत एका रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे.

जपानविरूद्धच्या पहिल्या हाफमध्ये बलाढ्य जर्मनी एकदम सुसाट होती. जर्मनीच्या गुंडोगनने ३३ व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. त्याला जपानच्या गोलकिपर गोंडाच्या चुकीमुळे पेनाल्टी मिळाली त्याचे गुंडोगनने गोलमध्ये रूपांतर करण्यात कोणतीही चूक केली नाही. फक्त पहिल्या हाफची चर्चा करायची झाली तर जर्मनीने जपानच्या गोलपोस्टवर १५ वेळा आक्रमक चाली रचल्या. त्यातील ६ शॉट्स हे त्यांचे ऑन टार्गेट होते. दुसरीकडे बचावात्मक मोडमध्ये असलेल्या जपानला एकदाही जर्मनीच्या गोलपोस्टवर आक्रमण करता आले नाही. बॉलचा ताबा आणि पासिंग या दोन्ही बाबतीत जर्मनी जपानच्या खूप पुढे होती.

पहिल्या हाफमध्ये जर्मनीचा धडाका पाहून हा सामना जर्मनी सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र दुसऱ्या हाफमध्ये जपानने झुंजार खेळी करत जर्मनीच्या गोलपोस्टवर आक्रमक चाली रचल्या. त्यांनी १२ पैकी ४ शॉट्स अचून गोलपोस्टच्या दिशेने मारले. त्यातील दोन शॉट्सवर गोल करण्यात जपानला यश आले. जपानकडून पहिला गोल हा रिट्सूने ७५ व्या मिनिटाला केला. जपानने बरोबरी साधत जर्मनीचे आक्रमण देखील रोखण्यात यश मिळवले. त्यांच्या बचाव फळीने जर्मनीचे ९ शॉट्स परतवून लावले. दरम्यान हा सामना १- १ अशा बरोबरीत राहील असे वाटत असतानाच ताकूमा असानोने ८३ व्या मिनिटाला जपानचा दुसरा गोल करत जर्मनीला मोठा धक्का दिला. यानंतर जर्मनीने इंज्यूरी टाईमपर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला मात्र जपानने त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला.

हे ही वाचा : 

आदित्य ठाकरे यांना फसवण्यासाठी भाजप काहीतरी दुसरंच बाहेर काढतील; रोहित पवार

शिंदे गट आणि दलित पँथर एकत्र येणार? राजकीय चर्चेला उधाण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version