spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jay Shah: जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधीच; केली मोठी घोषणा…

Jay Shah: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यामान सचिव जय शाह यांची निवड झाली आहे. जय शाह १ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. जय शाह (Jay Shah) हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) देखील अध्यक्ष आहेत. यावेळी जय शाह यांनी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याकरिता महत्वाचा निर्णय घेतला आहे. जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली महिला अंडर-१९ टी-२० आशिया कपची ( Under-19 T-20 Asia Cup) घोषणा केली आहे. या स्पर्धेमुळे आशिया खंडातील युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.

लवकरच अंडर १९ महिला टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. जो मलेशियामध्ये आयोजित केला असल्याचे सांगितले जात आहे. संघांची संख्या आणि स्पर्धेचे यजमानपद याबाबत स्पष्टता नसली तरी या स्पर्धेच्या आगमनाने आशियाई क्रिकेटमधील स्पर्धेची पातळी वाढणार असल्याची चर्चा आहे.

जय शाह यांची घोषणा
१ डिसेंबरपासून जय शाह आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. परंतु याचबरोबर त्यांना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. जय शाह यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीचे नेतृत्व केले. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सोडण्याआधीच त्यांनी महिला क्रिकेट संघासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा अंडर-१९ स्तरावर महिला टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे आता अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेच्या घोषणेनेही क्रिकेट चाहत्यांना आनंद होणार आहे.

काय म्हणाले जय शाह?
जय शाह म्हणाले की, “आशियाई क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला अंडर-19 आशिया चषक स्पर्धेची सुरुवात ही एक मोठी उपलब्धी आहे, ज्याद्वारे तरुण मुलींना मोठ्या मंचावर त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. या उपक्रमाद्वारे आशियातील महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल होणार आहे, या निर्णयांचे परिणाम काय होतील याचा विचार करताना आम्हाला अभिमान वाटतो.”

हे ही वाचा:

Jal Jeevan Mission व Swachh Bharat Mission ची अंमलबजावणी करण्याच्या Gulabrao Patil यांच्या सूचना

देशविरोधी बोलण्याची Rahul Gandhi आणि Congress ची सवय, राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून Amit Shah यांची टीका

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss