spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jay Shah ICC: जय शाह यांची अध्यक्षपदी निवड, क्रिकेट विश्वात शुभेच्छांचा वर्षाव, भाई मला माहीत आहे की…काय म्हणाला Gautam Gambhir?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पुढील अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. येणाऱ्या १ डिसेंबरपासून ते आयसीसीची जबाबदारी स्वीकारणार आहेत. आयसीसीचे अध्यक्ष होणारे जय शाह (Jay Shah) हे सर्वात तरुण भारतीय ठरले आहेत. जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह अनेक आजी आणि माजी खेळाडूंनी सोशल मिडीयाच्यामार्फत जय शाह यांचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जय शाह यांचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचा खेळ जगभरात एक नवा ठसा उमटवेल, असे सांगितले आहे.

आयसीसीचे (ICC) सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन भाई! तुम्ही क्रिकेटला आणखी उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहात. तुमचा दृष्टीकोन आणि मोहीम आयसीसीला मदत करेल, जसे की बीसीसीआयने केले आहे. असे ट्वीट हार्दिक पंड्याने केले आहे. खूप खूप अभिनंदन भाई! मला माहीत आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली जागतिक क्रिकेटचा मोठा विकास होईल! असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर जय शाह (Jay Shah) यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे जय शाह यांनी म्हटले आहे. क्रिकेटला अधिक जागतिक बनवण्यापासून ते आयसीसी आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे जय शाह यांनी सांगितले. आयसीसी टीमसोबत आणि सदस्य देशांसोबत मिळून क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे जय शाह यांनी म्हटले. आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे आणि या खेळाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्याचे आहे, असे सुद्धा जय शाह यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

Mahyuti चे राजकीय गणित बदलणार?; Fadnavis यांचे Shivaji Patil यांच्या नावाचे अप्रत्यक्ष संकेत

महाराजांच्या शिल्पात भुवईवर खोप का दाखवली? जबाब तो देना पडेगा! Amol Mitkari यांचं ट्वीट चर्चेत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss