spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

झूलन गोस्वामी घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिका तिच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल, असं तिनं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. झुलन गोस्वामी २५ सप्टेंबरला आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आज लॉर्ड्स येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून गोस्वामीला विजयी निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

झुनल गोस्वामीने मुलाखतीवेळी सांगितले की तिच्या मनात एकही वनडे वर्ल्डकप जिंकू शकलो नाही ताचे शल्य कायम राहणार आहे. भारत २००५ आणि २०१७ ला वनडे वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत पोहचला होता. मात्र भारताला फायनल जिंकता आली नव्हती. या दोन्ही अंतिम सामन्यात झुलन गोस्वामी खेळली होती. गोस्वामी पुढे म्हणाली की, ‘तुम्ही वर्ल्डकपची चार वर्षे तयारी करत असता. त्यामागे खूप कष्ट असतात. प्रत्येक खेळाडूसाठी वर्ल्डकप जिंकणं हे स्वप्नवत असतं. मात्र मी ज्या नजरेतून पाहत आहे भारतीय महिला क्रिकेटचा ग्राफ हा उंचच जाणार आहे. ज्यावेळी मी खेळण्यास सुरूवात केली त्यावेळी इतकी दीर्घ कारकिर्द असेल असा मी विचारच केला नव्हता. हा खूप भारी अनुभव आहे. मी क्रिकेट खेळू शकले याबद्दल मी स्वतःला नशिबवान समजते.’

झुलनने केवळ सर्वोत्तम गोलंदाज म्हणून नाही, तर सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. एक परिपूर्ण खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. झुलनची खेळाप्रति असलेली वचनबद्धता, अडचणींवर मात करण्यासाठी झगडण्याची तिची वृत्ती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुन्या तंत्रात अडकून न राहता बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचा तिचा गुणधर्म, तिला सर्वोत्तम बनवतो. कारकीर्दीत कधी पाठ, कधी टाच, खांदा, घोटा आणि शेवटी गुडघा अशा प्रत्येक दुखापतीवर हिमतीने मात करून तिने मैदानावर पुनरागमन केले. अधुनिक काळात गोलंदाजी करण्याचे आव्हान स्वीकारून झुलनने नव्या तंदुरुस्ती तंत्राशीही जुळवून घेतले.

हे ही वाचा:

WhatsApp आणि OTT प्लॅटफॉर्म कायद्याच्या कक्षेत,जाणून घ्या दूरसंचार विधेयकाशी संबंधित महत्वाचे मुद्दे

Central railway : फर्स्ट क्लास तिकीट धारकांना आता, एसी लोकलमधील प्रवासाची तरतूद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss