spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कपिल देव यांचं मोठं विधान, रोहित शर्मा आणि विराट कोहली एकटे विश्वचषक जिंकणार नाहीत

भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Former captain Kapil Dev) यांनी टीम इंडिया व्यवस्थापनाला (Team India Management) कठोर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे आणि विश्वचषक जिंकण्यासाठी संघ विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मावर (Rohit Sharma) अवलंबून राहू शकत नाही, असंही म्हटलं आहे. (आप विराट पे, रोहित पे या २-३ खालाडियोंपे पे भरोसा करेंगे की वो हमे विश्व कप जीतायेंगे तो ऐसा कभी भी नहीं हो सकता) जर तुम्हाला वाटत असेल की विराट कोहली, रोहित शर्मा आणि २-३ खेळाडू आपल्याला विश्वचषक जिंकून देतील. तर कधीही असं होणार नाही. तुम्ही तुमच्या संघावर विश्वास ठेवावा. आमच्याकडे अशी टीम आहे का? तर हो नक्कीच. आमच्याकडे काही मॅच विनर्स आहेत का? होय नक्कीच आहेत ! आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे विश्वचषक (World Cup) जिंकू शकतात”,असं कपिल देव यांनी एबीपी न्यूजवरील कार्यक्रमात सांगितले.

“तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल तर प्रशिक्षक, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. वैयक्तिक हितसंबंध (Personal interests) मागे घ्यावे लागतील आणि त्यांना संघाचा विचार करावा लागेल”,असं कपिल देव म्हणाला. विराट कोहली आणि रोहित शर्माचा हा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असेल, असेही यावेळी कपिलने सांगितले.

“सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे विश्वचषक भारतात होणार आहे. आमच्यापेक्षा कोणालाच परिस्थिती चांगली माहीत नाही. गेल्या ८-१० वर्षांपासून रोहित आणि विराट हे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत. विराट आणि रोहितचा हा शेवटचा विश्वचषक असेल का, असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली आहे. मला विश्वास आहे की ते खेळू शकतात पण त्यांना खूप मेहनत करावी लागेल. फिटनेस महत्त्वाची भूमिका बजावेल. अनेक तरुण पुढे येत आहेत, त्यांच्याशी स्पर्धा करू शकतील का? प्रश्नचिन्ह आहे पण ते त्यांचा खेळ कसा खेळायचा यावर अवलंबून आहे. क्षमतेची कमतरता नाही,” असाही कपिल देव ने पुढे म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

नड्डाजी यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या, दानवेंचा जे.पी.नड्डाना इशारा

अभिनेता शशांक केतकर असणार एका मोठ्या घोटाळ्याचा भाग, ‘त्या’ पोस्टमुळे आले चर्चांना उधाण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss