‘किंग’ कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट

भारताने पाकिस्तानला हरवत विश्वचषक मध्ये आणखी एका विजयाची नोंद केली

‘किंग’ कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट

भारताने पाकिस्तानला हरवत विश्वचषक मध्ये आणखी एका विजयाची नोंद केली. भारत भूमीत टीम इंडिया  ने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेटमध्ये टशन असली तरी दोन्ही संघांतील खेळाडूंचे एकमेकांशी खास नातं आहे. भारतीय संघ  आणि पाकिस्तानी संघातील मैत्री भारत-पाकिस्तान सामन्यानंतर दिसून आली. इंडिया विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम  यांच्यातील खास क्षण समोर आले आहेत. सामन्यानंतर विराट कोहलीने बाबर आझमला साईन केलेली जर्सी भेट दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वसीम अक्रम बाबर आझमवर भडकला
वसीम अक्रम एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ”बाबर आझमला आज असं करायला नको होतं. हे चित्र पाहिल्यावर मला वाटलं की आज हा दिवस नाही. जर तुम्हाला असं करायचं असेल आणि तुमच्या काकांच्या मुलाने कोहलीची जर्सी मागितलीच होती तर, तुम्ही मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याच्याकडून ती जर्सी घ्यायला हवी होती मैदानात नाही.”

 

विराट कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट
विराट कोहली आणि बाबर आझम यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. क्रिकेटच्या मैदानात जरी हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरोधात असले तरी, दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे. बाबर आझम क्रिकेट विश्वात नाव कमावण्याआधीपासूनच विराट कोहलीला ‘आदर्श’ (Role Model) मानतो. बाबर आझमने अनेक वेला मुलाखतीमध्ये हे सांगितलं असून कोहलीचं कौतुकही केलं आहे. तर विराट कोहलीनं बाबर आझमचं कौतुक केलं आहे.

 

हे ही वाचा: 

IND vs PAK च्या आजच्या सामन्यात शुभमन गिल खेळणार?

इंडिया आघाडीची ५ नोव्हेंबरला नागपुरात होणारी सभा पुढे ढकलली

Follow Us

Exit mobile version