किंग कोहलीचे अर्धशतक पूर्ण, टीम भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

किंग कोहलीचे अर्धशतक पूर्ण, टीम भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

आशिया चषक मधील भारत- पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात भारताचा आक्रमक खेळाडू ऋषभ पंत याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आज पुन्हा एकदा हे कट्टर संघ आमनेसामने येणार असताना पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज व मुख्य प्रशिक्षक वकार युनिस यांनी ऋषभ पंत याची पाठराखण केली आहे. दिनेश कार्तिकची यष्टिरक्षक म्हणून तर केएल राहुल आणि विराट कोहली परतल्यामुळे पंतसाठी जागा नव्हती हे बघून आश्चर्य वाटल्याचे युनिस यांनी म्हंटले. दरम्यान आजच्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत परतला आहे.

विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी साकारणार का, हा प्रश्न आज सर्वांनाच पडला होता. पण चाहत्यांना मात्र कोहलीवर विश्वास होता आणि विराटने हा विश्वास सार्थकी लावला. विराटने या सामन्यात षटकार लगावत आपले अर्धशतक साकारले. विराटचे हे या स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले. विराट कोहलीने यावेळी ४४ चेंडूंत ६० धावांची धमाकेदार खेळी साकारली. विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने यावेळी पाकिस्तानपुढे १८२ धावांचे आव्हान ठेवले.

भारतीय संघाला या आशिया चषकातील सर्वात चांगली सुरुवात या सामन्यात मिळाली. या सामन्यात भारताला ५४ धावांची दमदार सलामी देता आली. रोहित शर्माने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचे तोंडचे पाणी पळवले होते. रोहितने पहिल्याच षटकापासून धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. रोहितने यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. रोहितला यावेळी अर्धशतक साकारता आले नसले तरी त्याच्या या खेळीने भारतीय संघ बॅकफूटवर ढकलला गेला.

Exit mobile version