spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

क्रिकेटपटूंवर खैरात उधळणार्‍या सरकारनं… Vinesh Phogat, Avinash Sable यांच्या विक्रमी कामगिरीवर Kiran Mane यांची पोस्ट चर्चेत

महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने स्पॅनिश ग्रँड प्रिक्स स्पर्धेत (Spanish Grand Prix) सुवर्णपदक मिळवले आहे. तर दुसरीकडे धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने पॅरिस डायमंड लीग (Paris Diamond League) स्पर्धेत स्टीपल चेस प्रकारात स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. यावर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत खेळाडूंचे अभनंदन केले आहे. तसेच, केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारवर ताशेरे ओढत किरण माने यांनी “क्रिकेटपटूंना अकरा करोडची खैरात उधळणार्‍या महाराष्ट्र सरकारनं या मराठमोळ्या अविनाशचं साधं अभिनंदनही केलेलं नाही,” असे म्हंटले आहे.

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत किरण माने म्हणाले, “करोडोंत लोळणार्‍या क्रिकेट खेळाडूंवर पैशांची बरसात होत असतानाच दुसरीकडे गरीबी आणि अन्यायाशी झुंजत वर आलेली अनेक पोरंपोरी देशाचं नांव उंचावत आहेत… त्यांच्या बातम्याही येत नाहीत आपल्यापर्यंत… असो.”

पुढे भाजप वर टीका करत ते म्हणाले, “भाजपाच्या बड्या नेत्याकडून होणार्‍या कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक शोषणासाठी रस्त्यावर उतरुन न्याय मागणार्‍या… लाठीचार्ज करून मोदी सरकारनं अन्याय केलेल्या आणि भाजपाच्या भक्तडुक्कर पिलावळीनं ट्रोल केलेल्या विनेश फोगाटनं आपल्या कर्तृत्त्वानं सगळ्यांची थोबाडं फोडली. स्पेनच्या गां प्री स्पर्धेत जबरदस्त झुंज देत भारतासाठी गोल्ड जिंकत अभिमानानं तिरंगा फडकावला !”

“या स्पर्धेसाठी जाण्यासाठी विनेशला व्हिसा नाकारण्याचं कारस्थान झालं होतं. तो मिळवण्यासाठी तिला रक्ताचं पाणी करावं लागलं होतं हे कितीजणांना माहिती आहे? किती न्यूज चॅनल्सनी ही बातमी दिली? ते ही असो.”

ते पुढे म्हणाले, “दुसरीकडं मिल्ट्रीतल्या महार रेजीमेन्टच्या अविनाश साबळे या भीमाच्या छाव्यानं पुन्हा एकदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला ! पॅरीस डायमंड लीग मध्ये ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत त्यानं ही कामगिरी केली. याचीही आपल्याला फारशी खबर नाही. बीड जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त मांडवा गांवातला अविनाश हा पोरगा. शाळेसाठी सहा किलोमीटर चालत जावं लागायचं. गवंडीकाम करून शाळा शिकणारा अविनाश शाळेला उशीर होऊ नये धावत जायचा… तिथेच धावण्याची आवड निर्माण झाली. नंतर संभाजीनगरच्या एका अकॅडमीतल्या एका कोचनं त्याला हाकलून दिलं… “एक धावपटू म्हणून तू काहीही करू शकणार नाहीस. तुझ्यात ते टॅलेन्ट नाही. तू गवंडीकामच कर.” असा अपमानही केला.”

महाराष्ट्र सरकारवर टीका करत ते म्हणाले, “क्रिकेटपटूंना अकरा करोडची खैरात उधळणार्‍या महाराष्ट्र सरकारनं या मराठमोळ्या अविनाशचं साधं अभिनंदनही केलेलं नाही. हाच अविनाश आणि ही विनेश उद्या भारतासाठी ऑलिंपिक मेडल जिंकण्यासाठी सज्ज आहेत. परिस्थितीला धोबीपछाड देऊन पाय रोवून उभ्या राहिलेल्या या मातीतल्या लेकरांना सलाम… कडकडीत सलाम.”

गद्दार लोकांच्या सेनेमुळे अशा घटनांना वाव, म्हणून Mumbai तुंबते, काय म्हणाले Ambadas Danve?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss