spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

के एल राहुल इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, उपचारांसाठी जाणार परदेशात

इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माला भारतीय टीम चा कर्णधार आणि केएल राहुलला उपकर्णधार करण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट टीम ला इंग्लंड दौऱ्यावर एकूण सात सामने खेळायचे आहेत. इंग्लंडमध्ये भारतीय टीम १ ते ५ जुलै दरम्यान एक कसोटी सामना खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माला भारतीय टीम चा कर्णधार आणि केएल राहुलला उपकर्णधार करण्यात आले होते. मात्र, झालेल्या दुखापतीमुळे राहुल ला इंग्लंड दौऱ्यात खेळता येणार नाही.

भारतीय टेस्ट मॅच संघातील काही खेळाडू १६ जून ला इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. इतर खेळाडू देखील लवकरच इंग्लंडला रावण होणार आहेत. पण अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे, भारतीय टीम चा उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने म्हणजेच बीसीसीआय ने केएल राहुलला चांगल्या उपचारासाठी जर्मनीला परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्याच्या अनुपस्थितीत भारतीय निवड समितीला उपकर्णधारपदासाठी दुसऱ्या नावाचा विचार करावा लागणार आहे.

कर्नाटक आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असलेल्या राहुलने आतापर्यंत ४३ कसोटी, ४२ एक दिवसीय आणि ५६ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यावर्षी फेब्रुवारीपासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्याच्या दुखापतीने कारण समोर आल्यामुळे त्याला आता खेळता येणार नाही.

Latest Posts

Don't Miss