IPL साठी महेंद्रसिंग धोनी आला ऍक्शन मोडमध्ये, जिममधील फोटो तुफान व्हायरल

जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक पाहिली जाणारी टी-20 इंडियन प्रीमियर लीग आहे. अनेक स्टार क्रिकेटपटूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे.

IPL साठी महेंद्रसिंग धोनी आला ऍक्शन मोडमध्ये, जिममधील फोटो तुफान व्हायरल

जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक पाहिली जाणारी टी-20 इंडियन प्रीमियर लीग आहे. अनेक स्टार क्रिकेटपटूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. आयपीएलमध्ये खेळून खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच दुबईत होणार आहे. आता सर्वांचे डोळे या IPL कडे लागले आहेत. अशातच आता एका चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनी याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

चेन्नई सुपर किंग्जसह सर्व आयपीएल संघांनी त्यांच्या संबंधित सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली. चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीला कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत ठेवले आहे. म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसणार आहे. पण महेंद्रसिंग धोनी आयपीएलसाठी स्वत:ला कसा तंदुरुस्त ठेवतो हे तुम्हाला माहिती आहे का? सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी जिम करताना दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जिममधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करतो. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने २५० सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला आहे. IPL मध्ये महेंद्रसिंग धोनीने १३५.९२ च्या स्ट्राईक रेटने आणि ३८.७९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या ८७ धावा आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये २४ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.

 

हे ही वाचा:

कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या, नाना पटोलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

पूजा सावंतला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version