spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणात मोठी उपडेट, सापडलेली हाडे वडिलांच्या डीएनएशी जुळली

सध्या श्रद्धा वाळकर (Shraddha Walkar) हत्याप्रकणात रोज नवं नवीन खुलासे होत आहे. दिल्लीत (Delhi) झालेल्या तरुणीच्या हत्याकांडानं देशभरात एकच खळबळ उडाली होती. हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. श्रद्धा लग्नाचा तगादा लावत असल्यानं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या प्रियकर आफताब पुनावालानेच (Aftab Punawala) तिची हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून आफताबचा फास आवळला आहे.

दिल्ली पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या (Mehrauli and Gurugram) जंगलातून काही हाडे हस्तगत केली होती. त्याशिवाय, आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या घरातून काही पुरावे दिल्ली पोलिसांनी जमा केले होते. यामध्ये घरात आढळलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले होते. हे सगळे पुरावे न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. जंगलात सापडलेली हाडे ही आरोपी आफताब पुनावालाने दिलेल्या माहितीनंतर जप्त करण्यात आली होती. आरोपी आफताबकडून पोलीस चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आफताबविरोधात पुरावे जमा करण्याचे मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा (father) डीएनए (DNA) जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन महिने झाले तरी श्रद्धाने कोणताही थेट संपर्क साधला नसल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात तिची हत्या झाली असल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, आफताब आणि श्रद्धा यांच्यात सातत्याने भांडणे, वादविवाद होत असे. आफताबने अनेकदा श्रद्धाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर काही वेळेस श्रद्धाने आफताबचे घर सोडले होते. मात्र, आफताबने माफी मागत तिला घरी नेले होते. मात्र, आफताबवर विश्वास दाखवणे हे श्रद्धाच्या जीवावर बेतले.

हे ही वाचा : 

सीमावादावर गृहमंत्री अमित शाह काय करणार?

Rakhi Sawant घरातल्या प्रॉपर्टीचे नुकसान केल्यामुळे बिग बॉस राखी सावंत दाखवतील का बाहेरच्या रस्ता?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss